Samsung Galaxy Tab S8 सिरीज भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स……

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  सॅमसंगने अलीकडेच अनपॅक्ड 2022 इव्हेंट दरम्यान Galaxy Tab S8 सिरीज लॉन्च केली आहे. आता ही सिरीज भारतात सादर करण्यात आली असून, कंपनीने या टॅबच्या सर्व प्रकारांच्या भारतीय किंमती जाहीर केल्या आहेत.

Galaxy Tab S8, Galaxy Tab S8 Plus आणि Galaxy Tab S8 Ultra असे Galaxy Tab S8 सिरीजमध्ये येतात. यातील सर्वात महाग Galaxy Tab S8 Ultra आहे.

त्याची सुरुवातीची किंमत सुमारे 1 लाख 9 हजार रुपये आहे, तर यामधल्या टॉप व्हेरिएंटची किंमत सुमारे 1 लाख 23 हजार रुपये आहे.

Galaxy Tab S8 च्या केवळ WiFi आवृत्तीची किंमत 58,999 रुपये आहे, तर त्याचा 5G प्रकार 70,999 रुपयांना उपलब्ध असेल. Galaxy Tab S8+ ची WiFi आवृत्ती 74,999 रुपयांना उपलब्ध असेल, तर त्याच्या 5जी आवृत्तीची किंमत 87,999 रुपये आहे.

सॅमसंगच्या मते, Galaxy Tab S8 Ultra खरेदी केल्यावर ग्राहकांना 10,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळणार आहे. याप्रमाणे, Galaxy Tab S8+ खरेदी केल्यास 8,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल तर बेस मॉडेलवर 7000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.

Galaxy Tab S8 Ultra च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या टॅबलेटमध्ये 14.6-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसाठी सपोर्ट आहे आणि बेझल पातळ दिलेले आहेत.

Galaxy Tab S8 Ultra मध्ये S Pen चा सपोर्ट आहे आणि त्याची बॅटरी 11,200mAh आहे. यासोबत 45W सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. Galaxy Tab S8 Ultra मध्ये ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे.

13 मेगापिक्सल्सचा मुख्य सेन्सर आहे, तर 6 मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाइड लेन्स देण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe