Samsung Galaxy Z Flip 5 : सॅमसंगचा स्टायलिश फ्लिप फोन आला ! जाणून घ्या फिचर्स, किंमत व ऑफर्स

Ahmednagarlive24 office
Published:
Samsung Galaxy Z Flip 5

Samsung Galaxy Z Flip 5 released : सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ५ हा स्मार्टफोन भारतात नव्या कलर ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपल्या फ्लिप फोनच्या नवीन कलर व्हेरियंटची घोषणा केली आहे.

सॅमसंगचे म्हणणे आहे की, नवीन व्हेरियंट गॅलेक्सी झेड फ्लिप 5 चे स्पेशल एडिशन मॉडेल आहे, जे चार नवीन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. नवीनSamsung Galaxy Z Flip 5 स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्सबद्दल जाणून घेऊयात –

* Samsung Galaxy Z Flip 5 फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ५ स्पेशल एडिशन हा कंपनीचा लेटेस्ट फ्लिप फोन आहे. गॅलेक्सी झेड फ्लिप 5 मिंट, क्रीम, ग्रॅफाइट आणि लॅव्हेंडर या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. आता हा स्मार्टफोन चार नव्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

हँडसेट यलो, ग्रे, ब्लू आणि ग्रीन व्हर्जनमध्येही उपलब्ध असेल. म्हणजेच गॅलेक्सी झेड फ्लिप 5 आता एकूण 8 कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे.

गॅलेक्सी झेड फ्लिप ५ मध्ये ६.७ इंचाचा डायनॅमिक एमोलेड डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये ३.४ इंचाचा एमोलेड कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. सॅमसंगच्या फ्लिप स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आहे.

हँडसेटच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 5 मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ३७०० एमएएच ची बॅटरी आहे जी २५ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

सॅमसंगचा हा फोन आर्मर अॅल्युमिनियम फ्रेम आणि हिंज कव्हरसोबत येतो. हँडसेटला आयपीएक्स ८ वॉटर रेझिस्टन्स रेटिंग आहे. फ्लेक्स विंडोज आणि बॅक कव्हरसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ देण्यात आला आहे.

* Samsung Galaxy Z Flip 5 ची किती आहे किंमत?

गॅलेक्सी झेड फ्लिप 5 येलो कलर व्हेरिएंट ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह ९९,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरियंट १,०९,९९९ रुपयांना उपलब्ध करण्यात आला आहे. हा फोन सॅमसंगच्या वेबसाइट आणि निवडक आउटलेटवरून खरेदी करता येणार आहे.

* ऑफर

ऑफरबद्दल बोलायचे झाले तर एचडीएफसी बँक कार्ड वर ७,००० रुपयांचा कॅशबॅक आणि ७ ,००० रुपयांचा अपग्रेड बोनस सह एकूण १४ हजार रुपयांचा फायदा मिळू शकतो. एक्सचेंज ऑफरमध्ये सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ५ खरेदी केल्यास १४ हजार रुपयांचा अपग्रेड बोनस मिळेल. याशिवाय बजाज फायनान्स आणि एचडीएफसी बँक कार्ड सारख्या मोठ्या बँक कार्डसह ३० महिन्यांच्या ईएमआयवर (३,३७९ रुपये) फोन घेण्याची संधी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe