सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने प्रेक्षकांच्या मनात स्वत:च स्थान निर्माण केलय. रिंकू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच रिंकूने सोशल मीडियावर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे.
View this post on Instagram
रिंकूचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तिने तिचा हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ऑनलाई पोस्ट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.
यावेळी देखील ती अशाच एका ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आहे. रिंकू उर्फ आर्चीनं पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. या फोटोमधील तिचं सौंदर्य पाहून चाहते सैराट झाले आहेत. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी रिंकूच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
रिंकूराजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.