Sawan Purnima August 2023 : हिंदू धर्मात श्रावण पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी रक्षाबंधनाचा सणही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. बहिणी आपल्या भावांना राखी बांधून संरक्षणाचे वचन घेतात. दरम्यान, यावेळी श्रावण पौर्णिमेला एक विशेष योगायोग तयार होत आहे. या दिवशी शनि आणि गुरू प्रतिगामी होणार आहेत. यासोबतच रवि आणि बुधादित्य योगही तयार होत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार 200 वर्षांनंतर रक्षाबंधनाच्या निमित्ताने ग्रह-नक्षत्रांचा असा दुर्मिळ संयोग तयार होत आहे.
भद्रा कालामुळे 30 आणि ३१ ऑगस्टला पौर्णिमा येत आहेत. पौर्णिमा तिथी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:58 वाजता सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7:05 वाजता संपेल. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. अशातच जर तुम्ही या दिवशी काही खास उपाय केले तर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम जाणवतील, तसेच तुम्हाला माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळेल.
‘हे’ उपाय करणे ठरेल फायदेशीर
-श्रावण पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मीच्या अनंत आशीर्वादांचा वर्षाव होतो. आणि घरात सुख-शांतीचे वातावरण राहते.
-श्रावण पौर्णिमेच्या दिवशी 11 कवड्यांवर हळद लावा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा. पूजेनंतर या कवड्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने धन-समृद्धी वाढते. आणि कधीही पैशांची कमतरता भासत नाही.
-याच दिवशी गायत्री जयंतीही साजरी केली जाते. माता गायत्रीच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा आणि गायत्री मंत्राचा १०८ वेळा जप करा. असे केल्याने तुम्हाला त्याचे चांगले परिणाम जाणवतील, आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम तुमच्यावर असेल.
-श्रावण पौर्णिमेच्या दिवशी कदंब वृक्षची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने करिअरमध्ये यश मिळते. तसेच व्यवसायातही नफा होतो.
-या दिवशी स्नान करून तुळशीच्या रोपाला कच्चे दूध अर्पण करावे. आणि तुळशीच्या मुळाला तिलक लावावा. असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते.