Sawan Somvar 2023 : 28 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. या दिवशी प्रदोष व्रत आणि श्रावण सोमवारचा योगायोग आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. 28 ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या श्रावण शुक्ल पक्षातील द्वादशी आणि त्रयोदशी दोन्ही तिथी आहेत. यासोबतच इतर 4 शुभ संयोग तयार होत आहेत, जे व्रताचे महत्त्व आणखीनच वाढवतात.
या दिवशी आयुष्मान योग, सवर्थ सिद्धी योग, सौभाग्य योग आणि रवियोगात भोलेनाथाची पूजा करणे खूप शुभ मानले जात आहे. ज्योतिष शास्त्रानुसार उद्याचा दिवस 5 राशींसाठी खूप शुभ मानला जात आहे. भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद या राशींवर असेल, कोणत्या आहेत या राशी चला जाणून घेऊया.
सिंह
सिंह राशीच्या लोकांवर भोलेनाथ कृपा करतील. या काळात या लोकांचा समाजातील मान-सन्मान वाढेल. तसेच बरेच दिवस अडकलेले पैसे मिळतील. उत्पन्न वाढेल. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असू शकतो. परंतु गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करा.
मेष
मेष राशीच्या लोकांचासाठीही श्रावण सोम प्रदोष व्रताचा दिवस शुभ राहील. या काळात शत्रूंवर विजय मिळवाल. आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. तसेच वैवाहिक जीवनात गोडवा राहील. संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होईल. ज्यामुळे तुम्ही मन समाधानी राहील, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. या काळात बढतीची शक्यता निर्माण होत आहे.
धनु
धनु राशीवर महादेवाची विशेष कृपा असेल. नोकरी आणि करिअरमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-समृद्धी राहील. या काळात आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
या राशीच्या लोकांना पैसा मिळवण्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात मान-सन्मानात वाढ होईल. तसेच उत्पन्नात वाढ होऊ शकते. एकूणच हा काळ खूप चांगला मानला जात आहे.
मिथुन
मिथुन राशीचे जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. तसेच या लोकांना व्यवसायातही लाभ होऊ शकतो. कुटुंबातील संबंध चांगले राहतील. तसेच वैवाहिक जीवन आनंदी राहील.