Secret of Dreams : रात्री झोपेत आपल्याला बरेच स्वप्न पडतात, पण आपल्याला सगळीच स्वप्न लक्षात राहतात असे नाही, पण आपल्याला रात्री स्वप्नात दिसलेल्या गोष्टींचा अर्थ काय आहे? याचा कधी तुम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे? विज्ञानानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. होय, आजच्या या लेखात आपण अशाच काही स्वप्नांचे अर्थ जाणून घेणार आहोत, जे तुम्ही कधी पहिली असतील.
आपण सर्वजण स्वप्न पाहतो. आपण का पाहतो, त्याचे कारण काय, चिन्ह काय… हे प्रश्नही अनेकदा मनात निर्माण होतात. याच प्रश्नांवर जगभरात अनेक प्रकारचे संशोधन झाले आहे. तिथल्या सामाजिक श्रद्धा आणि धार्मिक श्रद्धेवर आधारित अनेक गोष्टी या विषयावर वेगवेगळ्या ठिकाणी बोलल्या गेल्या आहेत. आपल्या स्वप्न शास्त्रातही स्वप्नांच्या संदर्भात अनेक प्रकारचे अर्थ आणि चिन्हे सांगितली आहेत. असे मानले जाते की स्वप्ने काही प्रकारचे संकेत देतात. आज आपण जाणून अशी स्वप्ने जाणून घेणार आहोत जे आपल्याला भविष्यातील संकट किंवा समस्यांकडे निर्देशित करतात.
स्वप्नात ‘या’ गोष्टी पाहणे अशुभ मानले जाते
-जर तुम्हाला स्वप्नात दिसले की एखादा काळा साप तुम्हाला चावत आहे, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. तुम्ही एखाद्या आजाराला बळी पडू शकता.
-स्वप्नात मातीत धान्य मिसळत असल्याचे दिसले तर हे देखील अशुभ लक्षण आहे. हे स्वप्न येणार संकट दर्शवते.
-पुराचे पाणी किंवा घाण पाणी पाहणे हे देखील काही अडचणीचे लक्षण आहे.
-स्वप्नात सूर्यास्त होताना पाहणे म्हणजे तुम्हाला काही त्रास सहन करावा लागू शकतो.
-जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला उंचावरून खाली पडताना पाहिले तर ते काही संभाव्य अपयश किंवा नुकसानाचे लक्षण असू शकते.
-जर तुम्हाला स्वप्नात कावळा दिसला तर ते भांडणाचे लक्षण असू शकते.
-जर तुम्ही तुमच्या स्वप्नात घोड्यावरून पडताना दिसले तर ते तुमच्या कारकिर्दीत घसरण किंवा मंदीचे लक्षण असू शकते.
-त्याचप्रमाणे मांजर, रुक्ष झाडे आणि कोरडे जंगल हे देखील काही समस्या किंवा संकटाची चिन्हे आहेत.
-जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला कात्री वापरताना दिसले तर ते वैवाहिक जीवनात काही समस्या किंवा दुरावा येण्याचे संकेत आहे.
-जर तुम्ही तुमच्या स्वप्नात स्वत:ला अंडरवर्ल्डमध्ये पाहत असाल तर हे काही आगामी संकटाचे लक्षण देखील असू शकते.