Shani Dev : ज्योतिष आणि पौराणिक कथांमध्ये शनिदेवाला कर्म, न्याय आणि धर्माचे प्रतीक मानले जाते. त्याला कर्मिक न्याय देव म्हटले जाते कारण तो व्यक्तीला त्याच्या कर्मावर आधारित परिणाम देतो. शनिदेवाच्या वाईट प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात खूप अडचणी येतात. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या प्रभावाला घाबरतो आणि विशेषत: प्रत्येक शनिवारी त्यांची पूजा करतो, जेणेकरून त्यांचा शुभ प्रभाव प्राप्त होईल.
म्हणूनच शनिदेवाला ‘कर्मकार ग्रह’ असेही म्हणतात. दरम्यान, शनिदेव 4 नोव्हेंबर रोजी या वर्षातील सर्वात मोठा राशी परिवर्तन करणार आहेत, जिथे शनी पुढील 2 वर्षे विराजमान राहील. या काळात शनिदेव या 6 राशींना खूप त्रास देणार आहेत. चला त्या राशींबद्दल जाणून घेऊया, ज्यांना सावध राहण्याची गरज आहे.
मिथुन
शनीचे कुंभ राशीत प्रवेश झाल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. वडिलांच्या वयामुळे संकट येऊ शकते. त्यामुळे वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या तसेच त्यांना एकटं सोडू नका त्यांच्या सोबत वेळ घालवा. त्याच वेळी, मुलांकडून वाईट बातमी मिळू शकते. ज्यामुळे तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळू शकतो. याशिवाय जागा बदलण्याची शक्यता आहे.
कर्क
शनीच्या राशीत बदलामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप त्रासदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या राशीमध्ये अष्टम धैय्या असणार आहेत ज्यामुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. व्यक्तींना आरोग्य आणि कौटुंबिक जीवनाची काळजी घेणे फार गरजेचे आहे. हा काळ वाद आणि अडचणींनी भरलेला असेल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण खूप वाईट मानले जात आहे. वैवाहिक कार्यात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात मोठी अडचण येऊ शकते. व्यवसायात मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत नापास होऊ शकतात. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी शनिदेवाच्या राशीतील बदल खूप त्रासदायक मानला जात आहे. या काळात शनीची साडेसाती वादाचे कारण बनू शकते. तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. यावेळी तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. शुभ कार्यात अडथळे येऊ शकतात, त्यामुळे तुमचे मन निराश राहील. तरी स्वतःची जास्त काळजी घ्या.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी शनिदेवाच्या राशीतील बदल खूप वाईट असणार आहेत. मीन राशीच्या बाराव्या घरात शनि विराजमान आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनात मोठे बदल होऊ शकतात. या काळात तुमची गुंतागुंत वाढू शकते. तुम्हाला डोळ्यांच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास होईल. तुमच्या जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे.