Shani Dev : हिंदू धर्मात शनिदेवाला न्याय देवता म्हंटले आहे. ज्योतिष ग्रंथात शनिला कर्मकार, कर्मफल आणि न्यायाचा स्वामी मानले जाते. शनी देवाची आराधना केल्याने साधकांना न्याय, धर्म, कर्म, तंटे निवारणे, तंटे दूर होतात. ज्योतिषशास्त्रात नवग्रहांना महत्त्वाचे स्थान आहे. शनि ग्रह हा त्यापैकी सर्वात महत्वाचा आणि शक्तिशाली ग्रह मानला जातो.
भक्त शनिदेवाची उपासना करून त्याचे अशुभ प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, शनिदेव 2025 सालापर्यंत म्हणजेच दोन वर्षांसाठी स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत राहणार आहेत. या काळात कोणत्या राशींवर त्याचा प्रभाव दिसून येणार आहे ते जाणून घेऊया.
मेष
2025 पर्यंत शनिदेवाचे कुंभ राशीत राहणे मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानले जात आहे. या दरम्यान शनि मेष राशीच्या 11व्या घरात प्रवेश करेल. यामुळे या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात यश मिळू शकते. समाजात मान सन्मान देखील वाढेल. तसेच करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय तुमचे नातेसंबंध देखील चांगले राहतील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष खूप फलदायी मानले जात आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. तसेच त्यांना त्यांच्या आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकते. याशिवाय नवीन नोकरी मिळण्याची देखील शक्यता आहे. व्यवसायात कठोर परिश्रम केल्याने तुम्हाला मोठे यश मिळू शकते. हा काळ तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल.
कन्या
2025 पर्यंत कुंभ राशीत शनिदेवाचे वास्तव्य कन्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानले जात आहे. या दरम्यान या राशीच्या लोकांना शनिदेवाची कृपा लाभेल. तुमच्या प्रयत्नांचे फळ तुम्हाला कामात यशाच्या रूपात मिळू शकते. व्यवसायातही चांगले यश मिळेल. तसेच तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंदाने भरलेला असेल, या काळात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारू शकते. शनिदेवाच्या कृपेने विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकते. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येऊ शकतो. यावेळी कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही शनिवारी “ओम शं शनैश्चराय नमः” या मंत्राचा जप करू शकता. यामुळे तुम्हाला चांगले परिणाम जाणवू लागतील.