Shani Dev : ज्योतिषशास्त्रात राशिभविष्य आणि ग्रहांना खूप महत्व दिले जाते. तसेच नऊ ग्रह आणि राजयोग यांना देखील खूप महत्त्व आहे, यामध्ये न्याय आणि दंडाची देवता शनिची भूमिकाही खूप महत्त्वाची मानली जाते. इतर ग्रहांना एका राशीतून दुस-या राशीत जाण्यासाठी कमी वेळ लागतो, तर शनीला सुमारे अडीच वर्षे लागतात, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत जाण्यासाठी 30 वर्षे लागतात. अलीकडेच, शनि 30 वर्षांनी त्याच्या स्वतःच्या कुंभ राशीत विराजमान आहे. अशातच शनीच्या या हालचालीमुळे 3 राशींना खूप फायदा होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा शनि वक्री असतो तेव्हा तो विरुद्ध दिशेने फिरतो, तर जेव्हा शनि मार्गी असतो तेव्हा तो सरळ फिरू लागतो आणि शुभ परिणाम प्रदान करतो. शनिदेव 2025 पर्यंत कुंभ राशीत विराजमान राहतील. अशा परिस्थितीत शनिदेव मार्गी असल्यामुळे काही राशींवर 2024 साली शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे. शनि प्रत्यक्ष असल्यामुळे शश राजयोगही तयार होणार आहे.
जेव्हा शनि लग्न घरातून किंवा चंद्र घरातून केंद्रस्थानी असतो, म्हणजे शनिदेव लग्न किंवा चंद्रापासून कोणत्याही कुंडलीतील पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या भावात तूळ, मकर किंवा कुंभ राशीत असतील, तेव्हा शश योग तयार होणार आहे. या राजयोगचा काही राशींना खूप फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया.
शनि मार्गी असल्यामुळे ‘या’ 3 राशींना होईल फायदा !
कुंभ
शनि मार्गी असल्यामुळे नवीन वर्ष राशीच्या लोकांसाठी खूप लकी ठरणार आहे. या काळात व्यापारी आणि नोकरदारांसाठी काळ उत्तम राहील. यावेळी तुम्हाला भौतिक सुख-सुविधांचा लाभ मिळेल. शश राजयोगाने आर्थिक लाभ आणि कामात यश मिळेल. भागीदारीत काम करणाऱ्यांना लाभ मिळू शकतो. तसेच आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. तुम्ही 2024 च्या सुरुवातीला वाहने आणि मालमत्ता देखील खरेदी करू शकता. पैशाची बचत करण्यात यश मिळेल. तुमच्या जोडीदाराची तिथे प्रगती होऊ शकते.
मिथुन
शनि मार्गी असल्यामुळे 2024 हे वर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जात आहे. या काळात व्यक्तीला सर्व क्षेत्रात यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील. यासोबतच परखडलेले पैसे परत मिळतील. नोकरी किंवा व्यवसायात यश मिळू शकते. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. नशीब तुमच्या बाजूने असेल. कायदेशीर विवादांच्या बाबतीत, निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. तुम्हाला नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळू शकतात. समाजात तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. प्रवासाचीही शक्यता राहील. ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. मार्चनंतर तुमच्या इच्छित ठिकाणी बदली आणि बढती मिळण्याची शक्यता आहे. मेहनत करत राहा.
वृषभ
शनि मार्गी असल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकते. 2024 मध्ये आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात लाभाच्या संधी आहेत. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. पद आणि प्रतिष्ठा आणि मान-सन्मानाचे फायदेही वाढतील. व्यवसायासाठी वेळ उत्तम राहील. शश राजयोगामुळे संपत्ती आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. वृषभ राशीच्या लोकांनाही केंद्र त्रिकोन आणि शश राजयोगाचा लाभ मिळेल. यामुळे नोकरी आणि व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. व्यवसायात काही नवीन ऑर्डर मिळू शकतात. बेरोजगारांसाठी वेळ चांगला राहील, नवीन नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. गुंतवणूक करण्याच्या संधी मिळू शकतात. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा.