Shash Rajyog : ज्योतिष शास्त्रात न्यायदेवता शनिची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जाते. इतर ग्रहांच्या तुलनेत शनि हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात संथ गतीने जाणारा ग्रह आहे, शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला सुमारे अडीच वर्षे लागतात, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागतात.
अशा स्थितीत जेव्हा-जेव्हा शनि आपली हालचाल बदलतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पडतो. सध्या शनी मूळ त्रिकोन राशीत कुंभ राशीत मार्गी आहे. आणि एप्रिलमध्ये त्याचा उदय होणार आहे, या काळात शनिमुळे 3 राशींमध्ये राजयोग तयार होणार आहे. जो काही राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि लग्न भावापासून किंवा चंद्राच्या घरातून केंद्रस्थानी असतो, म्हणजे शनिदेव जर तूळ, मकर किंवा कुंभ राशीमध्ये 1व्या, 4व्या, 7व्या किंवा 10व्या स्थानात असेल तर अशा वेळी काही कुंडलीत शश योग तयार होतो. ज्या लोकांच्या कुंडलीत हा राजयोग असतो, त्यांच्या धन आणि कीर्तीमध्ये वाढ होते. ती व्यक्ती राजांप्रमाणे आयुष्य जगते. आता जाणून घेऊया शनीच्या हालचालीमुळे कोणत्या राशीत हा रोजयोग तयार होणार आहे.
कुंभ
कुंभ राशीत शनीचा ३० वर्षांनंतर होणारा उदय आणि शश राजयोग या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो. या काळात तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती व वेतनवाढ मिळू शकते. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात उत्पन्न वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोतही उघडतील. वर्षभर भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ दिसून येईल. काही महत्त्वाच्या योजना यशस्वी होऊ शकतात.
मिथुन
शश महापुरुष राजयोगाची निर्मिती मिथुन राशींसाठी उत्तम ठरू शकतो. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात, पदोन्नती मिळू शकते. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी राजयोग अत्यंत शुभ सिद्ध होईल. तो कोणत्याही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो. प्रत्येक कामात यश मिळेल.
वृषभ
शनिची उदय स्थिती आणि शश राजयोगाची निर्मिती वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. या काळात नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. नवीन नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. नोकरदारांना पदोन्नतीचा लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो आणि ते देश-विदेशात सहलीला जाऊ शकतात. राजकारणात सक्रिय व्यक्तींना यावेळी शाही सुख मिळेल, अचानक धनसंपत्तीचे योग येतील. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळेल.