मासिक पाळी दरम्यान सेक्स करावा कि नाही ?

मासिक पाळीच्या काळात शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेक जण सांगतात की या कालावधीत संबंध ठेवू नये, शिवाय महिलांनादेखील अशावेळी संबंध ठेवताना कसंतरीच वाटतं. 

मात्र याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, ते जाणून घेऊयात. तज्ज्ञांच्या मते, मासिक काळात शरीरसंबंध ठेवण्यात हरकत नाही. मात्र आवश्यक ती काळजी घ्यायला हवी.

मासिकपाळी दरम्यान सेक्स केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता तशी विरळच आहे. स्त्री शरीरात निरुपयोगी अंड जरी राहिले असले तरीही या काळात गर्भाशयातील त्वचेचे अस्तर बाहेर फेकले जाण्याची प्रक्रिया सुरू असते. 

तसेच गर्भधारणेसाठी आवश्यक असलेली हार्मोन्स या काळात शरीरात उपलब्ध नसतात त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते.

क्वचित प्रसंगी, जेव्हा मासिक पाळी दरम्यान सेक्स करून देखील गर्भधारणा झाल्याचा दावा केला जातो तेव्हा ते रक्त पाळीदरम्यानचे नसुन संभोग झाल्यानंतर बीज गर्भाशयातील अस्तराला चिकटल्याने झालेला रक्तप्रवाह असतो.

म्हणूनच जर अनावश्यक गर्भधारणा टाळायची असेल तर सुरक्षित सेक्सचा नेमका काळ जाणून घेणे गरजेचे आहे.मग, मासिकपाळी दरम्यान सेक्स करताना , कंडोम व इतर सुरक्षेचे उपाय करण्याची गरज नाही ?

हा एक चुकीचा समज आहे की, या काळात सेक्स करताना सुरक्षेची काही गरज नाही. मासिकपाळी दरम्यान सेक्स केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असली तरीही या दरम्यान केलेल्या सेक्समुळे लैंगिक आजार व

जंतूसंसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असते. म्हणून सेक्सदरम्यान कंडोम व सुरक्षेचे उपाय घेणे फार गरजेचे आहे. पण कंडोम वापरताना या चूका अवश्य टाळा.