Cotton buds : ‘हा’ व्यवसाय सुरु करा अन भरपूर पैसे कमवा

Ahmednagarlive24 office
Published:
Business Idea

Business Idea : आज आम्ही तुम्हाला एक जबरदस्त बिझनेस आयडिया सांगणार आहोत. कॉटन बड्स बिझनेस असे या व्यवसायाचे नाव आहे. कमी खर्चात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि चांगले उत्पन्न मिळवू शकता.

भारत सरकारही ‘मेड इन इंडिया’ला प्रोत्साहन देत आहे. नवीन स्टार्टअप आणि व्यवसायांना आर्थिक मदत देखील शासन करते. तुम्ही घरबसल्या हा व्यवसाय सुरू करू शकता. आपण मशीनद्वारे कॉटन बड्स बनवू शकता. सुरवातीला तुम्ही एक छोटं मशीन वापरू शकता.

कॉटन बड्स तयार करण्यासाठी प्लॅस्टिक किंवा लाकडाची छोट्या छोट्या काड्यांची आवश्यकता आहे. त्याच्या दोन्ही टोकांना कापूस लावावे लागेल. जेणेकरून कान स्वच्छ करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. यांना कॉटन बड्स किंवा कॉटन स्वॅब म्हणतात.

सर्वसाधारणपणे कॉटन बड्स तयार करण्यासाठी जी स्टिक लागते ती लाकडी ठेवली जाते. विशेष म्हणजे हे इको फ्रेंडलीही आहे. तुम्ही लाकडापासून बनवलेला स्पिंडल घ्या. ज्याची लांबी ५ सेंमी ते ७ सेंमी असावी. अगदी कमी किमतीत तुम्हाला हे बाजारात मिळेल.

त्यानंतर कापसाची गरज लागेल. जे आपण स्पिंडलच्या दोन्ही टोकांवर लावावे लागेल. ते तुम्हाला बाजारात सहज मिळू शकते. कॉटन बड्स पूर्ण तयार झाल्यावर त्यावर सेल्युलोज पॉलिमर केमिकल लावावीत. जेणेकरून कापसावर डाग व किंवा इतर अपाय होणार नाहीत. त्यामुळे कॉटन बड्स जास्त काळ टिकतात आणि खराब होत नाहीत.

* कॉटन बड्सपासून कमाई कशी करावी ते जाणून घ्या

ते बनवल्यानंतर हॉस्पिटल्स, टेस्टिंग लॅब, इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंग मार्केट, मेडिकल स्टोअर्स, कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सची दुकाने, ब्युटी पार्लर सेंटर्स, पेंटिंग प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये विक्री करता येईल. आजच्या काळात जनरल स्टोअर्स, मिनी स्टोअर्स आहेत जिथे अनेक मेडिकल डिव्हाइसेस वगैरे विकल्या जातात. तेथेही त्याची विक्री करून चांगले उत्पन्न मिळवता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe