Rajesh Exports Story : आपल्या देशात स्टार्टअप कल्चर वाढत आहे, दररोज नवनवीन स्टार्टअप सुरू होत आहेत, त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्थाही झपाट्याने वाढत आहे. आज स्टार्टअप आणि बिझनेसच्या दुनियेतून आम्ही तुमच्यासाठी एक अशी कहाणी घेऊन आलो आहोत, ज्याच्या माध्यमातून एका व्यक्तीने अवघ्या 10 हजार रुपयांचं कर्ज घेऊन कोट्यवधींची मोठी कंपनी बनवली आहे.
आज आपण राजेश एक्सपोर्ट कंपनीचे मालक असलेले भारतीय उद्योगपती राजेश मेहता यांच्याबद्दल पाहुयात. त्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि संयमाच्या जोरावर 13,800 कोटी रुपयांची ही कंपनी बनवली आहे. राजेश मेहता हे भारतीय स्टार्टअप्सच्या जगात सोन्याचे सौदागर म्हणून ओळखले जातात.

तर आज आपण राजेश एक्सपोर्ट बद्दल पाहणार आहोत, तसेच राजेश मेहता यांनी आज कोट्यवधी रुपयांची ही कंपनी कशी बनवली याचीही माहिती घेऊ. राजेश मेहता यांची कंपनी राजेश एक्सपोर्ट्स काही वर्षांपूर्वी शेअर बाजारातही लिस्ट झाली आहे.
* राजेश मेहता यांचे सुरुवातीचे दिवस
राजेश मेहता हे गुजरातचे रहिवासी आहेत. राजेशचं लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं, पण ते कदाचित त्याच्या नशिबात लिहिलं नव्हतं. त्यांचे वडील जसवंतरी मेहता हे दागिन्यांच्या व्यवसायात व्यावसायिक होते. राजेशचे वडील दागिन्यांच्या व्यवसायासाठी कर्नाटकात आले होते, त्यामुळे राजेशही कर्नाटकातील बेंगळुरू शहरात शिक्षण घेत होता. शिक्षणादरम्यान राजेशने वयाच्या सोळाव्या वर्षी वडिलांना व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. वडिलांसोबत व्यवसायात काम करत असताना ज्वेलरी इंडस्ट्रीत काहीतरी मोठं करायचं ठरवलं होतं आणि इथूनच त्यांनी राजेश एक्सपोर्ट्स कंपनी स्थापन करण्याचा प्रवास सुरू केला होता.
* 10,000 रुपयांचे कर्ज घेतलं, आज उभी राहिली 13,800 कोटी रुपयांची कंपनी
राजेशला ज्वेलरी इंडस्ट्रीत काहीतरी मोठं करायचं होतं, म्हणून त्याने भावाकडून दोन हजार रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्यानंतर बँकेकडून आठ हजार रुपयांचं कर्ज घेतलं. एकूण 10 हजार रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर राजेश एक्सपोर्ट्स नावाची कंपनी राजेशने 1982 मध्ये सुरू केली.
सुरवातीला राजेश चेन्नईहून थोड्या प्रमाणात दागिने आणून गुजरातमध्ये विकत असे. काही काळानंतर या कामात यश आल्यावर त्यांनी आपला व्यवसाय विस्तारला, त्यात त्यांनी हैदराबादहून चेन्नईला दागिने विकायला सुरुवात केली. राजेश मेहता यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आला
जेव्हा त्यांनी 1989 मध्ये सोन्याचे दागिने बनवण्यात पाऊल ठेवले. राजेशने बेंगळुरूमध्येच एक लहान गोल्ड मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन केले, जिथून तो जगभरात सोन्याची उत्पादने विकत असे आणि आज त्याच लहान उत्पादन युनिटचे राजेश एक्सपोर्ट्समध्ये रूपांतर झाले आहे ज्याचे मूल्य आज 13,800 कोटी रुपये आहे.
* ही कंपनी शेअर बाजारात लिस्टेड आहे राजेश मेहता यांची कंपनीही शेअर बाजारात लिस्टेड आहे, या कंपनीचे मार्केट कॅप शेअर मार्केटमध्ये 13,800 कोटी रुपये आहे. सध्या राजेश एक्सपोर्टकंपनी दरवर्षी 400 टनांपेक्षा जास्त सोन्याच्या दागिन्यांचे उत्पादन करते, ज्यामुळे त्यांची जगभरात सोने निर्यातदार म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे.