अवघ्या 2 शिलाई मशीनपासून सुरुवात, आज 1400 कोटींची फॅशन डिझाईनची कंपनी, जाणून घ्या सिनेअभिनेत्रींची फॅशन डिझाईन करणाऱ्या अनिता डोंगरे यांची यशोगाथा

Ahmednagarlive24 office
Published:

Success Story : आज आम्ही तुम्हाला अनिता डोंगरे यांची यशोगाथा सांगणार आहोत. अनिता डोंगरे या सेलिब्रिटी डिझायनर आहेत. अनिता डोंगरे यांचा स्वतःचा हाउस ऑफ अनिता डोंगरे असा कपड्यांचा ब्रँड आहे.

आज त्यांची कंपनी सुमारे 1400 कोटी रुपयांची आहे. अवघ्या 2 शिलाई मशिनपासून त्यांचा प्रवास सुरू झाला. या लढ्यात त्यांना आईची पूर्ण साथ मिळाली. अनिता डोंगरे यांनी आईच्या पाठिंब्याने स्वत:चे फॅशनचे साम्राज्य उभे केले.

अनिता डोंगरे आज देशातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत फॅशन डिझायनर्सपैकी एक आहे. कतरिना कैफ आणि आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर बियॉन्से आदी सारखे त्यांचे ग्राहक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिता डोंगरे यांच्या ब्रँडचे कपडे आणि अॅक्सेसरीज खूप महाग आहेत.

अनिता डोंगरे यांची आई एका कापडाच्या दुकानात शिलाईचे काम करत होती. इथूनच अनिताची कपड्यांची आवड वाढू लागली. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. अनिताच्या कुटुंबाने सुरुवातीला तिला खूप विरोध केला.

नातेवाइकांचे टोमणे तिला ऐकावे लागले. पण अनिताला आईची पूर्ण साथ मिळाली. यानंतर अनिता यांनी केवळ 2 शिलाई मशिन घेऊन काम सुरू केले. वर्षभरानंतर ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली.

* ब्रँडचा जन्म

अनिता डोंगरे यांच्या लक्षात आले की, फॅशन इंडस्ट्रीत महिलांची संख्या कमी आहे. याचे अनिताला खूप वाईट वाटले आणि तिने स्वतःच्या स्टाईलमध्ये अनोखे कपडे डिझाइन करण्यास सुरुवात केली. त्यांनी पाश्चिमात्य संस्कृतीला भारतीय चालीरीतींमध्ये मिसळण्यास सुरुवात केली.

दोन्ही संस्कृतींच्या फॅशनची सांगड घालून त्यांनी कपडे तयार केले. येथूनच त्यांच्या ब्रँडचा प्रवास सुरू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा त्यांचा ब्रँड आज 270 स्टोअर्सपर्यंत पोहोचला आहे. आज त्यांच्या कंपनीचे मूल्य सुमारे 1400 कोटी रुपये आहे.

* मोठं मोठे नामांकित कस्टमर

आज अनिता यांचे मोठमोठे नामांकित कस्टमर आहेत. कॅटरिना कैफसारखे अभिनेत्री देखील त्यांच्याकडूनच डिझाइन करून घेते यावरून त्यांचे यश लक्षात येईल. 2 शिलाई मशीन पासून सुरु झालेला त्यांचा ब्रँड आज 1400 कोटी रुपये पर्यंत जाऊन पोहोचला आहे. आज समाजातील प्रत्येक महिलेसाठी त्यांची यशोगाथा प्रेरणादायी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe