Shukra Gochar : चिंता सोडा…! सुरु होतोय तुमचा गोल्डन टाईम, वाचा सविस्तर…

Published on -

Shukra Gochar : ज्योतिषशास्त्रात शुक्राचे विशेष महत्त्व आहे. शुक्र हा राक्षसांचा गुरू आहे, तसेच तो वृषभ राशीचा स्वामी मानला जातो. शुक्र हा विलास, संपत्ती, कीर्ती, मालमत्ता, सौंदर्य, आकर्षण, व्यवसाय, प्रेम आणि भौतिक सुखसोयींचा कारक मानला जातो. हा ग्रह दर 26 दिवसांनी आपली हालचाल बदलतो.

दरम्यान, शुक्र 31 मार्च रोजी आपली राशी बदलेल काळात शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या जीवनावर दिसून येईल. पण पाच राशी आहेत ज्यांच्यासाठी शुक्राचे हे संक्रमण वरदान ठरेल. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी पाहूया…

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन खूप चांगले असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यात गोडवा येईल. संपत्ती जमा होईल. व्यापारी आणि नोकरदारांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. उत्पन्नही वाढेल. पदोन्नतीची शक्यता आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांच्या कामाशी संबंधित इच्छा पूर्ण होतील. यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल. संपत्तीत वाढ होईल. पगारात वाढ होऊ शकते. तसेच व्यवसायात देखील लाभ होईल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना करिअरमध्ये फायदा होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. परदेशात जाऊन नोकरी करण्याची संधी मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमची प्रशंसा करतील. आर्थिक स्थिती सुधारेल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कर्क

कर्क राशीच्या लोकांवरही शुक्राची विशेष कृपा असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पुस्तकांची आवड वाढेल. जमीन आणि मालमत्ता खरेदीसाठी हा काळ उत्तम आहे. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण वरदान ठरेल. भौतिक सुखसोयी वाढतील. करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रेमी युगुलांसाठी काळ शुभ आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe