Sunflower Seeds Benefits : सूर्यफुलाच्या बिया आरोग्यासाठी आहेत वरदान, रोजच्या आहारात करा समावेश…

Published on -

Sunflower Seeds Benefits : सूर्यफुल दिसायला खूप सुदर असते, हे फुल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, फक्त सुर्यफूलच नव्हे तर त्याच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी वरदान आहेत. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, सेलेनियम, प्रथिने, मँगनीज, जस्त, लोह, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन बी 6 आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. हे हृदय आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. आज आपण याच्या फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत, चला तर मग…

सूर्यफुल बियांचे फायदे :-

-सूर्यफुलामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण नगण्य असते. फायबरचे प्रमाणही चांगले असते. याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. कोलेस्ट्रॉलची पातळीही संतुलित राहते.

-सूर्यफुलाच्या बिया थायरॉईडचा धोका कमी करतात.

-या बिया रोगप्रतिकारक शक्तीसाठीही फायदेशीर मानल्या जातात. याचे सेवन केल्याने शरीर सर्दी, खोकला, ताप इत्यादी आजारांशी लढण्यास सक्षम बनते.

-सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. तसेच त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते.

-सूर्यफुलाच्या बिया पचनसंस्थेसाठीही खूप फायदेशीर मानल्या जातात. याचे सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. बद्धकोष्ठता, ऍसिडिटी इत्यादी आजारांपासून आराम मिळतो.

-सूर्यफुलाच्या बिया हाडे देखील मजबूत करण्यास मदत करतात.

-मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर मानले जाते. मधुमेही रुग्ण अल्प प्रमाणात ते स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात.

अशा प्रकारे करा सेवन

-सूर्यफुलाच्या बियांचे सेवन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. ते भाजून स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकतो. तुम्ही या बिया सॅलडसोबतही खाऊ शकता. तुम्ही या बिया ओट्समध्ये घालून, भाज्यांमध्ये मिसळून, केक किंवा कुकीजमध्ये घालून ब्रेड आणि पीनट बटरमध्ये मिसळून खाऊ शकता. लक्षात घ्या सूर्यफुलाच्या बिया नेहमी सोलून काढल्या पाहिजेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe