Swami Samarth : स्वामींच्या ‘या’ विचारांनी बदलून जाईल तुमचं जीवन, वाचा…

Ahmednagarlive24 office
Published:
Swami Samarth

Swami Samarth : श्री स्वामी समर्थ अकल्लकोट महाराजे हे श्री दत्त दिगंबराचे अवतार मानले जातात. आजही मोठ्या प्रमाणात लोक स्वामी महाराजांची भक्ती करताना पहायला मिळतात. प्रत्येक भक्तांना वाटतं की, स्वामी महारांजांचा कृपाशिर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर असावा. स्वामी आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी सदैव असतात, असा दांडगा विश्वास प्रत्येक भक्तांना आहे. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ स्वामींच्या या वाक्याने स्वांमींच्या भक्तांना प्रचंड बळ मिळते.

स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही प्रत्येक भक्ताला बळ देणारा आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. स्वामींचे विचार आजही प्रत्येकाचे जीवन बदलून टाकतील. आज आपण स्वामींचे असे काही विचार पाहणार आहोत, जे तुमचे जीवन बदलून टकतील, तसेच तुमच्या जीवनात साकारत्मकता येईल.

श्री स्वामी समर्थांचे विचार 

अरे बाळा, 
उदास असशील तर माझे नाव घे, 
दु:खी असशील तर माझे ध्यान घे, 
मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे,
एवाढ्याने समाधानी नसशील तर बाळ… अक्कलकोटची वाट घे

वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पणज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरु नका.

तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नेस, तर डोळे बंद करुन माझे ध्यान कर, अशाने तु माझ्याशी संवाद साधशील

बाळा, मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो… फक्त एकदास हाक मार…

लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही,कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही. 

कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल, तर मा सांग,
माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे, 
त्यापर्यंत नक्की पोहचेल. 

विवेक बुद्धीने विचार करुन निर्णय घेतला असशील तर, 
मागे हटू नकोस, ठाम राहा आणि ते कृतीत आण.

जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा,
कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल.

तुला जर वाटत असेल की, कशाला स्वामींना उगाच त्रास द्याचा आपले दु:ख सांगून? तर खरा त्रास तू आता देत आहेस, काहीच न सांगून…

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल,
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe