Sweet Potatoes : हिवाळ्यात ‘रताळे’ खाणे अतिशय गुणकारी, मोसमी आजारांपासून राहाल दूर…

Published on -

Health Benefits of Sweet Potatoes : हिवाळा सुरू झाला आहे. हळू-हळू थंडी जाणवू लागली आहे. अशातच या मोसमात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण या मोसमात आजपण लवकर येते. म्हणूनच या मोसमात आरोग्याची जास्त काळजी घेणे फार गरजेचे असते. या ऋतूत ताप, खोकला, सर्दी अशा अनेक समस्या उद्भवतात. म्हणूनच या ऋतूमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्याची जास्त गरज असते.

या मोसमात योग्य आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. दरम्यान आज आम्ही तुमच्यासाठी असे एक सुपरफूड घेऊन आलो आहोत, ज्याच्या सेवनाने तुम्ही हिवाळ्यात स्वतःचा अनेक आजारापासून बचाव करू शकाल.

या हंगामातील एक सुपर फूड म्हणजे रताळे, त्याचा आहारात समावेश करून तुम्ही उष्णतेसह अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. त्यात असलेले रासायनिक घटक जसे की जीवनसत्त्वे (A, B, C), कॅल्शियम, प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. चला जाणून घेऊया रताळ्याच्या सेवनाने आपण कोणत्या आजारांपासून मुक्ती मिळवू शकतो.

सर्दी आणि खोकला

हिवाळ्याच्या काळात लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने सर्दी आणि तापाचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत रताळ्याचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. कारण त्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. याच्या नियमित सेवनाने या समस्या दूर होतात.

बद्धकोष्ठता

रताळ्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होत नाही. यामुळे पचनशक्ती चांगली राहते. यामध्ये असलेले फायबर केमिकल तत्व पोटाच्या समस्या दूर करण्यात खूप मदत करते.

अशक्तपणा

रताळ्याचे नियमित सेवन केल्याने शरीरात ॲनिमिया होत नाही. यामध्ये असलेले आयर्न तुमच्या शरीरातील ॲनिमिया दूर करते. त्याचे सेवन केल्याने तुम्हाला ऊर्जाही मिळते.

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रताळे खूपच फायदेशीर आहेत. खराब जीवनशैलीमुळे मधुमेहाचा धोका कायम असतो. पण हिवाळ्यात त्याचा धोका अधिक वाढतो. म्हणूनच त्याच्या सेवनाने इन्सुलिन सुधारते. ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुधारणा होते.

दमा

हिवाळ्याच्या मोसमात श्वासोच्छवासाच्या आजाराचा दमा होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत रताळ्याचे सेवन करून त्यात सुधारणा करता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe