HDFC Business Loan: एचडीएफसी बँक देईल व्यवसाय वाढीसाठी 40 लाखापर्यंत कर्ज! वाचा या कर्जाची ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HDFC Business Loan:- बरेच व्यक्तींचे लहान किंवा मोठे व्यवसाय असतात. कालांतराने ज्यांचे व्यवसाय लहान स्वरूपात असतात त्यांना व्यवसाय वाढवायचा असतो व त्याकरिता पैशांची आवश्यकता भासते. त्यामुळे अनेक व्यावसायिक बँकांच्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.

याकरिता देशातील अनेक बँकांच्या माध्यमातून व्यवसाय कर्ज दिले जातात. या सर्व बँकांची यादी मधून जर आपण एचडीएफसी बँकेचा विचार केला तर एचडीएफसी बँकेचे व्यवसाय वृद्धी कर्ज हे देशातील उपलब्ध असलेले जे काही व्यवसाय लोन कर्जाचे पर्याय आहेत त्यापैकी उत्तम आहे.

एचडीएफसी बँकेचे व्यवसाय कर्ज हे लहान व वाढत्या अशा दोन्ही प्रकारचे व्यवसायांकरिता खूप फायद्याचे आहे. या कर्जाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला एचडीएफसी बँकेकडून याकरता व्याजदर देखील ऑफर केली जातात. तुमची पात्रता किंवा तुमचे क्रेडिट यानुसार बँक कर्जाचे व्याजदरात देखील बदल करते. त्यामुळे या लेखामध्ये आपण एचडीएफसी बँकेच्या बिझनेस लोन विषयी माहिती घेणार आहोत.

 एचडीएफसी बिझनेस लोनची वैशिष्ट्ये

एचडीएफसी व्यवसाय वाढ म्हणजेच वृद्धी कर्ज योजनेअंतर्गत 40 लाखापर्यंत लोन मिळू शकते. विशेष म्हणजे बँकेच्या निकषानुसार काही निवडक ठिकाणांसाठी 50 लाख रुपये देखील कर्ज मिळते. या माध्यमातून तुम्ही तुमच्या व्यवसायाची गरज पूर्ण करण्याकरिता आणि तुमचा व्यवसायाची वाढ करण्याकरिता कर्ज मिळू शकतात.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील या माध्यमातून मिळते. तुम्ही कर्जाच्या रकमेपैकी जेवढी रक्कम वापराल तेवढ्या रकमेवरच तुम्हाला व्याज द्यावे लागते. यामध्ये ड्रॉप लाईन वर ड्रॉप सुविधा पाच ते पंधरा लाख रुपयांपर्यंत असून तिचा कार्यकाळ 12 ते 48 महिन्यांचा असतो. तुम्ही या कर्जासाठी पात्र आहात की नाही हे तुम्ही ऑनलाईन किंवा एचडीएफसी बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन अवघ्या साठ सेकंदामध्ये तपासू शकतात.

तुम्ही जर मागील काही कर्ज घेतले असेल तर तिचा परतफेडीचा इतिहास पाहून तुम्हाला कर्ज वितरित केले जाते. महत्वाचे म्हणजे या कर्जाचा परतफेडचा कालावधी अतिशय लवचिक असून तुम्ही 12 ते 48 महिन्याच्या कालावधीत कर्जाची परतफेड करू शकतात. तसेच या कर्जाच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे  या सोबत तुम्हाला उपलब्ध असलेले क्रेडिट संरक्षण देखील मिळते.

तसेच यासंबंधी असलेल्या लागू कायद्यानुसार तुम्हाला जीवन कव्हरेज आणि कर लाभ देखील देण्यात येत.जर तुम्ही यापैकी  विमा किंवा इतर सेवा निवडल्या तर कर्ज देण्याच्या वेळी कर्ज रकमेतून यासाठीचा प्रीमियम कपात केला जातो. यामध्ये एखाद्या ग्राहकाचा नैसर्गिक/ अपघाती मृत्यू झाल्यास ग्राहक किंवा नॉमिनी पेमेंट प्रोटेक्शन इन्शुरन्स चा लाभ घेऊ शकतात. हा लाभ कर्जावरील जी मुख्य थकबाकी आहे त्या थकबाकीचा जास्तीत जास्त कर्जाच्या रकमेपर्यंत विमा करते.

 एचडीएफसी बिझनेस लोनसाठी पात्रता

एचडीएफसी बिझनेस वृद्धी कर्ज योजनेअंतर्गत स्वयंरोजगार असलेला व्यक्ती, मालक तसेच प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, व्यवसायामध्ये सहभागी असलेल्या भागीदारी कंपन्या, उत्पादन, व्यापार व सेवा इत्यादी करिता हे कर्ज सुविधा दिली जाते. तसेच संबंधित व्यवसायाची वार्षिक उलाढाल कमीत कमी 40 लाख रुपयांपर्यंत असणे गरजेचे आहे.

तसेच जो व्यक्ती कर्जासाठी अर्ज करत आहे त्या व्यक्तीचा संबंधित व्यवसायातील अनुभव हा कमीत कमी तीन वर्षाचा व जास्तीत जास्त पाच वर्षाचा असणे गरजेचे आहे. तसेच या व्यवसायाचा किमान व्यवसाय आयटीआर दीड लाख रुपये प्रति वर्ष असावा. कर्जासाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय कमीत कमी 21 वर्षे असावे व जास्तीत जास्त 65 वर्ष असावे.

 एचडीएफसी व्यवसाय कर्जा करिता आवश्यक कागदपत्रे

एचडीएफसी बिझनेस ग्रोथ लोन करिता ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट, इलेक्शन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता असते. उत्पन्नाचा पुरावा म्हणून मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट,

तसेच आयटीआर च्या गणनेसह उत्पन्न, ताळेबंद आणि चार्टर्ड अकाउंटंट प्रमाणित/ ऑर्डर झाल्यानंतर मागील दोन वर्षासाठींचे नफा आणि तोटा पत्रक, व्यवसाय चालू ठेवल्याचा पुरावा याकरिता आयटीआर/ व्यापार परवाना/ स्थापना / विक्रीकर प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता भासते.