Eye Care Tips : अलीकडे लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. बदलत्या लाईफस्टाईलमुळे नागरिकांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतोय. आताच्या या युगात लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर प्रत्येकासाठीच आवश्यक बनला आहे. यामुळे आता मोठ्या प्रमाणात लोक आपली दृष्टी गमावत आहेत. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नजरेचा चष्मा बसू लागला आहे.
एका आकडेवारीनुसार जगातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला सध्या चष्मा लागलेला आहे. यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे अनेकांच्या माध्यमातून दृष्टी सुधारण्यासाठी एखादा उपाय सुचवा, नजरेचा चष्मा काढून टाकणारा एखादा उपाय सांगा असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अलीकडे डोळ्यांच्या समस्या सामान्य झाल्या आहेत. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात डोळ्यांच्या समस्या पाहायला मिळतात. वाढते प्रदूषण, मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या स्क्रीनमुळे लोकांची दृष्टी कमी होत चालली आहे.
पण असे काही घरगुती उपाय आहेत जे केल्याने दृष्टी सुधारणार आहे. खराब दृष्टीचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाढलेला स्क्रीन टाइम. याशिवाय आहारात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे दृष्टी कमजोर होते. दृष्टी सुधारण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. भरपूर फळे आणि भाजीपाला खाल्ल्यानेही दृष्टी परत येण्यास मदत होते. दृष्टी कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता.
शरीरात या जीवनसत्वाची कमतरता असेल तर याचा थेट परिणाम डोळ्यांवर होतो. ज्या व्यक्तीच्या शरीरात अ जीवनसत्व कमी असते त्याची दृष्टी कमजोर पाहायला मिळते. यामुळे शरीरात विटामिन ए ची कमतरता होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेवर मात करण्यासाठी, आपण फळे, भाज्या आणि इतर अनेक पदार्थ खाऊ शकता. मांसाहार देखील व्हिटॅमिन ए चा उत्तम स्रोत आहे. यामुळे जर तुम्ही मांसाहारी असाल तर योग्य मांसाहार घेतला पाहिजे.
जर तुम्ही शाकाहारी असाल तर व्हिटॅमिन एच्या कमतरतेवर मात करण्यासाठी अनेक प्रकारची फळे खाऊ शकतात. आंबा, टरबूज, पपई, सपोटा इत्यादी पिवळी किंवा केशरी फळे व्हिटॅमिन ए चे चांगले स्रोत आहेत. गाजर, बीट्स, सलगम, रताळे, मटार, टोमॅटो, ब्रोकोली, भोपळा, संपूर्ण धान्य आणि हिरव्या पालेभाज्या, कोथिंबीर हे व्हिटॅमिन ए चे चांगले स्त्रोत आहेत.
चीज, मोहरी, राजमा आणि बीन्समध्ये देखील मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे. एकंदरीत विटामिन ए च्या कमतरतेमुळे दृष्टी कमकुवत होत असल्याने विटामिन ए ज्या-ज्या पदार्थांमध्ये असते त्या पदार्थांचे सेवन केल्यास दृष्टी चांगली सुधारू शकते.