Drinking Tea : जेव्हा शरीरात थकवा जाणवतो आणि काम करण्याची इच्छा होत नाही, तेव्हा एक कप चहा घेतल्याने शरीर सक्रिय होते. चहामध्ये कॅफिन आढळते, जे मेंदू आणि शरीर दोन्ही सक्रिय ठेवण्यास मदत करते. हे जगभरात आढळणारे सर्वात सामान्य पेय आहे, जे बऱ्याच लोकांसाठी एक सवय बनले आहे.
चहाप्रेमींसाठी त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. या लोकांना सकाळी उठल्यावर पहिल्यांदा चहा लागतो, पहिली गोष्ट हवी असते ती म्हणजे चहा. मात्र, याचे योग्य सेवन केल्यास ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक नाही.

जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पेयांमध्ये मसाला चहाचाही समावेश करण्यात आला आहे. पण चहा पिताना काही चुकाही आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. अशातच जर तुम्ही चहाचे शौकीन असाल तर या 5 चुका नक्की टाळल्या पाहिजेत.
चहा पिताना ‘या’ चुका टाळा !
-जर तुम्ही जेवणासोबत चहाचे सेवन केले तर तुमच्या शरीराला पुरेसे पोषक तत्व मिळत नाहीत. अन्नासोबत कॅफीनचे सेवन केल्याने शरीराला पोषक द्रव्ये शोषण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे जेवणासोबत चहा पिण्याऐवजी काही वेळाने चहा प्यावा.
-रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. रिकाम्या पोटी कॅफिनचे सेवन केल्यास पचनक्रिया मंदावते. याशिवाय तुम्हाला उलट्या आणि मळमळाचा त्रास होऊ शकतो.
-एकापेक्षा जास्त कप चहा पिणे देखील तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तुम्हाला झोपेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पचनक्रियाही मंदावते. अशास्थितीत एका वेळी जास्त चहा घेणे हानिकारक ठरू शकते.
-काही लोक चहा पुन्हा-पुन्हा गरम करून घेत असतात. खरंतर चहा जास्त वेळ ठेवल्याने त्यातील टॉक्सिन्स वाढतात. त्यामुळे खूप दिवसांपासून ठेवलेला चहा प्यायल्यास पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
-दिवसातून अनेक वेळा चहा प्यायल्याने दीर्घकाळ आरोग्याला हानी पोहोचते. यामुळे तुम्हाला गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे दिवसभरात दोन कपपेक्षा जास्त चहा पिऊ नका. याशिवाय, या सवयीमुळे तुमची भूक देखील कमी होते, ज्यामुळे तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता देखील होऊ शकते.













