ग्रहाच्या भ्रमण कक्षेत महाभयंकर स्फोट ! धडकेमुळे धूळ, प्रकाश आणि इतर मातीसदृश्य कचरा अवकाशात

Published on -

Marathi News : आसियान- २१ क्युजे या ग्रहाच्या भ्रमण कक्षेत महाभयंकर असा स्फोट झाला आहे. स्फोट ग्रहापासून जवळच झाला. हा स्फोट त्याच्याच दोन उपग्रहांचा झाल्याचे म्हटले जाते. या स्फोटामुळे निर्माण झालेली धूळ अवकाशात कित्येक किलोमीटरपर्यंत पसरली आहे.

या धडकेचा फोटोमॅट्री डाटा गोळा करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या धडकेमुळे मुख्य ताऱ्याभोवती म्हणजेच असियान – २१ क्युजेला ९०० दिवसांचे ग्रहण लागले.

पृथ्वीपासून १८०० प्रकाशवर्षे दूर म्हणजे सूर्यमालेबाहेरही घटना घडली. अवकाश संशोधक डॉक्टर मॅथ्यू केनवर्दी हा आसियान- २१ क्युजे या ताऱ्याच्या भोवतीच्या ग्रह गोलांची पाहणी करत होता. त्याचवेळी आसियान- २१ क्युजे या ग्रहाला ओलांडताना त्याच्या आसपासच्या ग्रह गोलांवर सावली पडताना दिसली.

डिसेंबर २०२१ मध्ये त्याला हा प्रकार दिसला. त्यानंतर ९०० दिवस आसियान – २१ क्युजे तारा अतिशय क्षीण प्रकाश सोडताना दिसला. त्याचवेळी तिथून झगझगीत रंगीत प्रकाश बाहेर पडताना दिसला. हा प्रकाश आसियान- २१ क्युजेच्या कक्षेतल्या आणि नेपच्यून एवढ्या आकाराच्या दोन ग्रहांच्या धडकेमुळे निर्माण झाला.

या धडकेमुळे धूळ, प्रकाश आणि इतर मातीसदृश्य कचरा अवकाशात फेकला गेला. त्यातल्या सर्वात मोठ्या तुकड्याला सायनेशिया असे नाव देण्यात आले. त्यावरचे तापमान ७०० अंश सेल्सियसवर असून गेल्या तीन वर्षांपासून तापमानाचा पारा जराही खाली उतरलेला नाही.

नेदरलँडच्या लायडेन संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. मॅथ्यू केनवर्थी यांनी ही घटना नोंदवली. साधारणतः अडीच वर्षांपूर्वीच आसियान – २१ क्युजे तारा काहीसा फिका दिसू लागला.

नुकत्याच झालेल्या धडकेची माहिती ही आतापर्यंतच्या अवकाश संशोधनातली सर्वात नवी माहिती आहे. याद्वारे सौर मालेतील इतर ग्रहांचे आणि भविष्यातल्या घटनांचा माग काढता येणार आहे. धुळीचे ढग आसियान- २१ क्युजे ताऱ्याभोवती घिरट्या घालत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe