Grahan Yog : नऊ ग्रहांमध्ये सूर्य ग्रहाला विशेष महत्व आहे. अशातच जेव्हा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. दरम्यान, ग्रहांचा राजा सूर्य 14 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार जिथे अधिक राहू उपस्थित आहे.
सूर्य आपली राशी बदलताच दोन ग्रहांचा संयोग होईल. राहु जेव्हा सूर्य किंवा चंद्र भेटतो तेव्हा ग्रहण योग तयार होतो. वैदिक ज्योतिषात हा योग अशुभ मानला जातो. पण काही राशींना ग्रहण योगामुळे या काळात लाभ होणार आहे. काहींसाठी यशाची दारे उघडतील तर काहींच्या संपत्तीत वाढ होईल. चला जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना लाभ मिळेल.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी ग्रहण योग यशाची दारे उघडणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. आर्थिक बाजू मजबूत राहील. रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी ग्रहण योग शुभ राहील. उत्पन्न वाढेल. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी मिळेल. तथापि, कुटुंबात त्रास होऊ शकतो. कामाची जबाबदारीही वाढू शकते. लक्ष देऊन काम करा.
वृषभ
राहू आणि सूर्याचा संयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी देखील शुभ राहील. भौतिक सुखसोयी वाढतील. आदर वाढेल. करत असलेल्या कामात यश मिळेल, जिद्दीने पुढे जात राहा.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठीही हा योग उत्तम राहील. आर्थिक संकटातून दिलासा मिळेल. संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.