Ketu Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात केतूला मायावी ग्रह मानला जाते. केतू हा मोक्षाचा कारक मानला जातो. कुंडलीतील केतूची मजबूत स्थिती व्यक्तीला साहसी बनवते. जर केतूची स्थिती चांगली असेल तर मोक्ष, त्याग, अध्यात्म, तांत्रिक ज्ञान इत्यादींबद्दलची आवड वाढते. धनाची प्राप्तीही होते. यश मिळते.
अशातच सोमवार, 8 जुलै रोजी पहाटे 4:12 वाजता केतू हस्त द्वितीय पद नक्षत्रात प्रवेश करेल. हा नक्षत्र बदल सर्व राशींवर परिणाम करेल. काही राशींना याचा खूप फायदा होईल. कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी केतूचे संक्रमण खूप शुभ राहील. उत्पन्न वाढेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. संपत्ती जमा होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. भौतिक सुखसोयी वाढतील.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठीही केतूचे संक्रमण शुभ राहील. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. व्यवसायात लाभ होईल. कुटुंबात सुख-शांती राहील. या काळात विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. धैर्य आणि शौर्यही वाढेल. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी केतूचा नक्षत्र बदलही अनुकूल राहील. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. वाहन, जमीन, घर खरेदीसाठी हा काळ शुभ राहील. तुम्हाला आध्यात्मिक संपत्ती मिळेल. मनोकामना पूर्ण होतील.