Ajab Gajab News : ऑक्सिजनची गरज नसलेला पृथ्वीवरील एकमेव सजीव

Published on -

Ajab Gajab News : पृथ्वीच्या पाठीवरील एकूण एक सजीवांना जीवंत राहण्यासाठी श्वास घेण्याची गरज भासते. श्वासावाटे प्रत्येक जीव प्राणवायू अर्थात ऑक्सिजन आपल्या शरीरात ओढून घेतो आणि कार्बन डाय ऑक्साईड हा वायू बाहेर फेकत असतो.

प्रत्येक प्राणिमात्राची ऑक्सिजन ही सर्वात प्रमुख गरज असते. यामध्ये दुसऱ्या जिवावर अवलंबून राहणारे परजीवी कीटकही येतात. पण याच पृथ्वीवर असा एकमेव जीव आहे की, ज्याला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासत नाही.

‘नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्समध्ये प्रकाशित संशोधन अहवालानुसार, अशा जीवाची ओळख आधीच पटवण्यात आली आहे. या जीवाला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची अजिबात आवश्यकता भासत नाही.

संशोधकांच्या मतानुसार केवळ ८ मिमी. आकार असलेल्या या जीवाचे नाव ‘हेनेगुया सालमिनिकोला’ असे आहे. हा असा एकमेव जीव आहे, जो श्वास घेताना ऑक्सिजनचा वापर करत नाही. हा पांढरा जीव चिनूक सेल्मसच्या मांसाला संक्रमित करतो. मात्र, हेनेगुया सालमिनिकोला जगण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा कुठून मिळवतो, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.

विज्ञान सांगतं की बहुपेशीय जीव ऊर्जा निर्माण करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. ही प्रक्रिया मायटोकॉन्ड्रियामध्ये पूर्ण होते. या प्रक्रियेसाठी हेनेगुया सालमिनिकोलाजवळ स्वतःची विशिष्ट जनुके (जीन्स) आहेत.

जेव्हा शास्त्रज्ञांनी परजीवीमध्ये त्या जीनचा शोध घेतला तेव्हा ते पूर्णपणे गायब झालेले होते. हेनेगुया सालमिनिकोला श्वास घेण्यासाठी आवश्यक जीन का गमावले, याचे उत्तर संशोधक अद्याप शोधू शकलेले नाहीत. शास्त्रज्ञांच्या मते हा जीव ज्या प्राण्याच्या आधारे जगतो त्याच्याकडून त्याला ऊर्जा मिळत असावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe