Budh Gochar 2024 : कोणताही ग्रह त्याच्या निश्चित वेळेच्या अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या कालावधीत 12 राशींवर ग्रहांच्या हालचालींचा परिणाम दिसून येतो. अशातच 2 एप्रिल म्हणजेच आज बुध मेष राशीत प्रतिगामी होणार आहे. याचा अर्थ या राशीमध्ये बुध विरुद्ध दिशेने फिरताना दिसेल, बुध ग्रहाची उलटी चाल काही शींसाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकते. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया…
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाची उलटी हालचाल खूप फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवनात नवीन पाहुण्याच्या आगमनाची चांगली बातमी मिळू शकते. जीवनातील सर्व समस्या कमी होतील. देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाशी संबंधित समस्याही दूर होतील. कामावर लक्ष केंद्रित केल्याने तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. कोर्टाशी संबंधित प्रकरणांतून दिलासा मिळेल. परदेशात जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु शिक्षकांच्या मदतीने त्या दूर होतील.
सिंह
सिंह राशीच्या लोकांना बुधाच्या उलट्या चालीचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. या काळात तुमचा दिवस उत्तम राहील. तुम्हाला एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमच्या मनाला आणि हृदयाला शांती मिळेल. प्रेमळ जोडप्यांसाठी हा काळ खूप चांगला मानला जातो आहे. बऱ्याच दिवसांनी मित्र भेटल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो आहे. पण गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाची उलटी हालचाल खूप शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात फायदा होऊ शकतो. याशिवाय नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही कामात सहज यश मिळेल. कुटुंबातील आरोग्यविषयक चिंता दूर होतील. कुटुंबासोबत कुठेतरी टूरवर जाण्याचा बेत आखता येईल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.