‘या’ आहेत मुकेश अंबानी व गौतम अदानी यांच्या सर्वात महागड्या कार ! किंमत ऐकून डोकं गरगरेल

Ahmednagarlive24 office
Published:
Mukesh Ambani and Gautam Adani

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे देशातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. दोघेही अब्जावधी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत तर गौतम अदानी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

या दोघांचा व्यवसाय देशातच नव्हे तर परदेशातही पसरला आहे. अनेकांना प्रश्न पडत असेल की हे अतिश्रीमंत व्यक्ती नेमके कोणते वाहने वापरतात? तर या दोघांच्याही गॅरेजमध्ये अनेक आलिशान गाड्या आहेत.

त्यांच्याकडे अतिशय महागड्या गाड्यांची लाईनच आहे. याठिकाणी आपण दोघांच्याही महागड्या कारबद्दल माहिती पाहुयात –

Mukesh Ambani Rolls Royce Phantom & Cullinan

मुकेश अंबानी यांच्या सर्वात महागड्या कारमध्ये Rolls Royce Phantom आणि Cullinan यांचा समावेश आहे. त्यांच्या दोन गाड्यांचा उल्लेख येथे करण्यात आला आहे कारण रिपोर्टनुसार, या दोन्ही कारची किंमत सुमारे 13 कोटी रुपये (कस्टमायझेशनसह ऑन-रोड) आहे. रोल्स रॉयस कलिनन ही लक्झरी एसयूव्ही आहे जी अंबानी यांनी गेल्या वर्षी (2022 च्या सुरुवातीला) खरेदी केली होती.

मुकेश अंबानी यांच्याकडे रोल्स रॉयस फँटम ड्रॉपहेड कूप देखील आहे. त्याची किंमत ही सुमारे 13 कोटी रुपये (कस्टमायझेशनसह) असल्याचे सांगितले जात आहे. ही कार त्यांच्याकडे बऱ्याच काळापासून आहे. कारमध्ये फीचर्स आणि कम्फर्टची कोणतीही कमतरता नाही.

Gautam Adani Rolls Royce Ghost

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम अदानीच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस घोस्ट सीरिजचाही समावेश आहे. ही बहुधा त्यांची सर्वात महागडी कार आहे. याचा एक्सटीरियर आणि इंटीरियर भाग प्रीमियम आहे. यात 6.2 लीटर V12 इंजिन आहे जे 5250 आरपीएमवर 563 एचपी आणि 1500 आरपीएमवर 780 एनएम टॉर्क जनरेट करते.

रोल्स रॉयस घोस्ट सीरिजची भारतात किंमत 6.95 कोटी रुपयांपासून सुरू होते. मात्र, विविध कस्टमायझेशनमुळे याची ऑन-रोड किंमत सुमारे 10 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. ही कार 4.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग गाठू शकते. याची टॉप स्पीड 250 किमी प्रति तास आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe