Healthy Drinks : हृदयासाठी वरदान ठरतात हे ड्रिंक्स, जाणून घ्या फायदे..

Ahmednagarlive24 office
Published:

Healthy Drinks : बदललेली जीवनशैली आणि धावपळीच्या जीवनामुळे अनेकदा आपले आरोग्याकडे लक्ष कमी होते. यामुळे सध्या हृदयविकाराच्या घटना वाढल्या आहेत. मात्र आहारामध्ये योग्य गोष्टींचा समावेश केला तर आपले हृदय निरोगी राहू शकते. यासाठी आहारात काही हेल्थ ड्रिंकचा समावेश करा. ज्यामुळे आपले हृदय निरोगी राहील. जाणून घ्या या ड्रिंक बद्दल.

ब्रोकोली सूप

ब्रोकोलीमध्ये असलेले कॅरोटीनॉइड ल्युटीन हे आपल्या हृदयाच्या धमन्यांसाठी उत्तम ठरते. दरम्यान, ब्रोकोलीमुळे इतर अनेक आजारही बरे होतात. यामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे कमी होतात. दरम्यान, ब्रोकोली ही पोटॅशियमचा एक उत्तम स्रोत आहे. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणामध्ये राहते. यामुळे ब्रोकोलीपासून बनवलेले सूप प्यायल्याने तुमचे आणि तुमचे हृदय निरोगी राहते.

गाजर आणि बीटरूट

बिट हे आल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले नायट्रेट हे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये बदलते. आणि त्याच वेळी, गाजरमध्ये असलेले नायट्रेट रक्त प्रवाह सुधारते. दरम्यान, यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन जे रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यास मदत करते. यामुळे गाजर आणि बीटरूटचा रस आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.

काकडीचा रस

काकडीमुळे आपले शरीर हायड्रेट राहते. पण याव्यतिरिक्त काकडीमध्ये भरपूर पाणी आणि फायबर असल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते. याशिवाय यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट अनेक आजारांचा धोका कमी करतात.

पुदिन्याचा रस

पुदिना फक्त पदार्थांची चवच नाही वाढवत तर यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के आढळतात. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. जे आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर ठरते.

पालक रस

पालक हा आयर्नचा उत्तम स्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन के आणि नायट्रेटने देखील असते. यामुळे हे दोन्ही पोषक रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवून हृदयविकार टाळतात. इतकंच नाही तर पालक केवळ शरीराला डिटॉक्स करत नाही तर तुमचे हृदयही निरोगी ठेवते. यामुळे आहारात पालक चा समावेश तुमच्या हृदयासाठी फायदेशीर ठरतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe