Drinks That Can Damage Liver : यकृत हा शरीराचा मुख्य अवयव आहे. वाईट सवयी, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जास्त प्रमाणात मद्यपान यकृताला हानी पोहोचवू शकते. बरेचदा लोक यकृताला खूप हलक्यात घेतात आणि त्याच्याशी संबंधित समस्या येईपर्यंत त्याच्याकडे लक्ष देत नाहीत.
यकृत शरीरातील हानिकारक पदार्थ काढून शरीर निरोगी ठेवण्याचे काम करते. शरीरातील जीवनसत्त्वे साठवण्यासोबतच ते शरीराला विविध संसर्गापासून वाचवते.
अशातच आपण अन्नासोबत नकळत अशा काही पेयांचे सेवन करतो, जे शरीरासाठी हानिकारक असतात आणि थेट यकृताला हानी पोहोचवतात.
या पेयांमध्ये साखर आणि कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने ते प्यायल्याने मधुमेह, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. आज आपण याच पेयांबद्दल जाणून घेणार आहोत…
गोड पेये
खूप गोड पेये पिणे शरीरासाठी खूप हानिकारक मानले जाते. या पेयांमुळे यकृताला थेट नुकसान होते आणि अनेक आजारांचा धोका वाढतो. बऱ्याच वेळा आपण हेल्दी घटकांपासून बनवलेल्या पेयांमध्ये भरपूर साखर घालतो, ज्यामुळे आपण त्या पेयाचे फायदे घेऊ शकत नाही, उलट ते पेय पिल्याने शरीराला हानी होते.
शीतपेये
सॉफ्ट ड्रिंक्स शरीरासाठी हानिकारक असतात आणि ते जास्त प्रमाणात प्यायल्याने वजनही झपाट्याने वाढते. सॉफ्ट ड्रिंक्समध्ये रिफाइंड साखर मोठ्या प्रमाणात वापरली जाते, ज्यामुळे शरीराला हानी पोहोचते आणि यकृतावर परिणाम होतो. ज्यांचे यकृत कमकुवत आहे त्यांनी शीतपेय पिणे टाळावे.
मीठ जास्त असलेले पेय
बरेच लोक चवीसाठी जास्त मसाले आणि मीठ असलेली पेये खातात, या पेयांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, जे शरीरासाठी हानिकारक ठरते आणि यकृताला नुकसान पोहोचवते. अनेक वेळा, लिंबूपाणी, ताक आणि सत्तू पेये यांसारख्या आरोग्यदायी पेयांमध्ये जास्त मीठ टाकले जाते, जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
अति प्रमाणात कॅफिनचे सेवन
कॅफिनचे अतिसेवन शरीराला हानी पोहोचवते आणि यकृतासाठी खूप धोकादायक आहे. यकृत निरोगी ठेवण्यासाठी चहा आणि कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन करू नका. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते, जे कॅल्शियम शोषणात व्यत्यय आणू शकते. त्यामुळे हाडे कमकुवत होतात. चहा-कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्यानेही पोटाचा त्रास होऊ शकतो.