Indoor Plants : वाढत्या प्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यामध्ये हवेतील प्रदूषण हे जास्त आहे. दरम्यान, यामुळे अनेक आजारही बळावत चालेले आहे. यापासून बचाव करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये मनी प्लांट्स लावू शकतो ज्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होईल. जाणून घ्या या मनी प्लांट्सबद्दल.
आपल्या घरातील हवा शुद्ध करण्यासाठी आपण काही मणी प्लांट लावू शकतो. ज्यामुळे हवा शुद्ध राहील आणि आपल्या आरोग्यास होणारी हानी कमी होईल.
रबर प्लांट
ही एक अत्यंत प्रभावी वनस्पती आहे. हवेतील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेते आणि त्याचे रूपांतर श्वास घेण्यायोग्य ऑक्सिजनमध्ये करते. यामुळे हे प्लांट घरामध्ये असणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
स्नेक वनस्पती
स्नेक प्लँट हे हवेतील कार्बन मोनॉक्साईड, बेंझिन, फॉर्मल्डिहाइड आणि घरातील हवेत आढळणारी इतर घातक केमिकल्स शोषून घेते. इतकंच नव्हे तर हे प्लांट नवीन ऑक्सिजन देखील तयार करते. यामुळे हे प्लांट अत्यंत फायदेशीर ठरते. दरम्यान, हे प्लांट घरामध्ये ज्या ठिकाणी जास्त प्रकाश येतो त्या ठिकाणी ठेवावे. या प्लांटला फक्त 2-3 दिवसातून एकदाच पाणी द्यावे.
एरिका पाम
हे प्लांट हवेतील केमिकल्स जसे की एसीटोन, जाइलीन आणि टोल्युइन यांना फिल्टर करते. यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते. दरम्यान, या झाडास दररोज पाणी घालण्याची गरज नसते. मात्र हे प्लांट सूर्यप्रकाश पडेल अश्या ठिकाणी ठेवू नये.
पीस लिली
हे झालं आपल्या घरातील एकूण ६० टक्के हवा शुद्ध करू शकते असे समोर आले आहे. दरम्यान, याला रोज पाणी देण्याची आवश्यकता नसते. तसेच याला सूर्यप्रकाशापासून लांब ठेवावे लागते.
स्पायडर प्लांट
जर तुम्हाला तुमच्या घरातील हवा शुद्ध ठेवायची असले तर हे प्लांट अत्यंत उपयुक्त ठरते. दरम्यान, दोन दिवसांत घरातील ९० टक्के हवा हे प्लांट शुद्ध करू शकते. दरम्यान, याची पाने थोडी लांब असल्यामुळे ते कुंडीत लावणे अधिक सोयीचे आहे. तसेच, हे प्लांट जास्त सूर्यप्रकाशात ठेवू नये. तसेच याला जास्त पाण्याची आवश्यकता देखील नसते.