Low Vitamin D : ही लक्षणे दर्शवतात ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता, करा हे उपाय..

Updated on -

Low Vitamin D : सूर्यप्रकाश आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. उन्हामधून आपल्या शरीरास व्हिटॅमिन डी मिळते. मात्र सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे आपल्याला व्हिटॅमिन डी ची कमतरता होऊ शकते. जे आपल्या शरीरासाठी धोक्याचे लक्षण आहे. याचा प्राईनं हा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती होतो. यामुळे जर तुम्हाला पुढील लक्षणे तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता दर्शवतात.

व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे आपल्याला उन्हापासून मिळते. दरम्यान, हे आपल्या चरबीमध्ये विरघळणारे एक व्हिटॅमिन आहे. या व्हिटॅमिनला सनशाईन व्हिटॅमिन असेही म्हणतात.

दरम्यान, सध्याच्या जीवनशैलीमुळे आपण उन्हात जाणे टाळतो. यामुळे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, तुमच्या शरीरात हायपोकॅल्सेमिया, हायपरपॅराथायरॉईडीझम, ऑस्टियोमॅलेशिया आणि रिकेट्स सारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

दरम्यान, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे लहान मुलाना मुडदूस हा आजार सुद्धा होतो. ज्यामुळे त्या बाळाची हाडे हाडे कमकुवत होण्याचा धोका असतो ज्यामुळे त्याचा योग्य विकास होत नाही.

दरम्यान, जर तुम्हाला सतत थकल्यासारखे वाटणे थकवा किंवा कायम नैराश्य असणे अशी लक्षणे दिसत असतील तर ही व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. याशिवाय स्नायू दुखणे, शरीरातील हाडे कमकुवत होणे, किंवा मुलांमध्ये वाकडी हाडे होणे अशी लक्षणे दिसत असतील तर ही सुद्धा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे आहेत.

दरम्यान, सूर्यप्रकाश हा एक मोफत मिळणार स्रोत आहे. यामुळे जर तुम्ही दररोज थोडा वेळ उन्हात फिरला तर याची कमतरता सहज पूर्ण होते. मात्र यासाठी सकाळी सोळंकी येणाऱ्या कोवळ्या सूर्यप्रकाशात आपण थोडा वेळ थांबावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe