Mangal Gochar 2024 : ग्रहांचा सेनापती मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे. हा ग्रह शौर्य, शक्ती, उर्जा, धैर्य इत्यादींचा कारक मानला जातो. मंगळाच्या कृपेनेच माणूस निर्भय आणि धैर्यवान बनतो. तसेच, नेतृत्व क्षमता अधिक तीक्ष्ण होते. भीती दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो. पदोन्नतीचीही शक्यता आहे.
अशातच 12 जुलै रोजी मंगळ शुक्र, वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. या संक्रमणामुळे काहींच्या जीवनात सकारात्मकता तर काहींच्या आयुष्यात नकारात्मकता येईल. तर काही राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी वृषभ राशीतील मंगळाचे संक्रमण शुभ राहील. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया…
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण फायदेशीर ठरेल. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायात लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
सिंह
सिंह राशीच्या लोकांवरही मंगळाच्या विशेष आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. यश मिळण्याची दाट शक्यता असेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ आहे. सरकारी नोकरी मिळू शकते. भाऊ, व्यवसायासाठी काळ अनुकूल राहील. व्यवसायासाठी प्रवासाचे योग येतील. घर किंवा वाहन खरेदीसाठी हे शुभ आहे. मधुमेही रुग्णांना डोळ्यांशी संबंधित समस्या असू शकतात.
धनु
मंगळाचे हे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसेल. व्यवसायात लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. कर्ज देण्याची चूक करू नका.