Ajab Gajab News : ‘हा’ आहे पळणारा साप ! वेग इतका कि घोड्यालाही हरवेल…

Published on -

Ajab Gajab News : जगभरात सापांच्या शेकडो प्रजाती आढळून येतात. त्यापैकी काही निवडक प्रजातीचे सापच विषारी असतात. अन्य प्रजातींचे साप बिनविषारी असतात. पण त्यांची ओळख पटवणे सर्वसामान्य माणसांना जमत नाही.

त्यामुळे साप दिसला की तो विषारीच असणार असेच प्रत्येकाला वाटते. त्यामुळे सापाला मारण्याचा प्रयत्न केला जातो. भारतात असाच एक बिनविषारी साप आहे की जो खरेतर माणसांना कोणताही धोका पोहोचवत नाही. पण या सापाचे वैशिष्ट्य असे की तो घोड्याहून जास्त वेगाने पळू शकतो.

सापाच्या या प्रजातीला भारतात अनेक नावांनी ओळखले जाते. ‘रत्नाक’ हे त्यापैकी एक नाव आहे. इंग्रजीमध्ये या सापाला रॅट स्नेक असे म्हणतात. हे साप मानवाच्या सानिध्यात वावरतात.

शेतातील किंवा घरांमधील उंदीर हे त्यांचे अन्न असते. शेतातील उंदीर खाऊन खरंतर हे साप शेतीचे नुकसान होण्यापासून वाचवतात. पण हा साप हुबेहुब जहाल विषारी असलेल्या नागासारखा ( किंग कोब्रा) दिसत असल्याने लोक त्याला नाग समजून ठार मारतात.

हा साप भारतातील सर्वात वेगाने पळणाऱ्या सापांपैकी एक आहे. या प्रजातीचे साप अनेक रंगांमध्ये आढळतात. भारतात ते तपकिरी किंवा राखाडी रंगाचे, तर अमेरिकेत ते पिवळ्या रंगाचे असतात. या सापाचा पळण्याचा वेग एवढा जास्त असतो की त्यामुळे त्याला घोड्याहूनही जास्त वेगवान प्राणी असे म्हटले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe