Richest King : जगभरातून राजेशाही कधीच नामशेष झाली असली तरी राजेशाही राजवटींच्या काही खुणा आजही अनेक देशांत दिसून येतात. थायलंडचा राजा हा आजही गडगंज संपत्तीचा मालक आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्याचा समावेश आहे. महा वजिरालोंगकोर्न असे या राजाचे नाव आहे.
या राजाच्या मालकीची ३८ विमाने आहेत. सोन्याने मढवलेल्या ५२ नौका आहेत आणि अगणित हिरे-माणके आहेत. या राजाकडे एवढी अमाप संपत्ती आहे, जी पाहून बड्या बड्या उद्योगपतींचेही डोळे दिपू शकतात.

एका अर्थविषयक इंग्रजी वृत्तपत्राने नुकताच या राजावर आधारित एक लेख प्रकाशित केला आहे. त्यामुळे राजा राम एस्क पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या लेखामध्ये असा दावा करण्यात आला आहे की,
या राजाकडे ४० अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे ३ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. राजाच्या मालकीची जमीन आहे, तब्बल ६ हजार ५६० हेक्टर. त्यामध्ये अनेक सरकारी वास्तू, मॉल, हॉटेल आणि अन्य संस्थांच्या इमारती उभ्या आहेत.
त्याशिवाय सियाम कमर्शियल बँकेमध्ये २३ टक्के भागीदारी आणि सियाम सिमेंट समुहामध्ये १३३.३ टक्के भागीदारीसह राजा महा वजिरालोंगकोर्न याची थायलंडच्या वित्तिय आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण भागीदारी आहे.
इतर मौल्यवान खजिन्यामध्ये ५४५.६७ कॅरेटचा ब्राऊन गोल्डन जुबिली हिरा आहे. तो जगातील सर्वात मोठा आणि महागडा हिरा आहे. त्याची किंमत तब्बल ९८ कोटी रुपये आहे.