Ajab Gajab News : टास्मानियामध्ये एक दुर्मिळ प्रजातीचा मासा आढळून आला आहे. हँड फिश असे माशाच्या या प्रजातीचे नाव आहे. ही प्रजाती सुमारे २० वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झाली असे वैज्ञानिक मानत होते. मात्र, टास्मानियामध्ये एक हँड फिश मृतावस्थेत आढळून आल्याने वैज्ञानिकांचे कुतुहल जागले आहे.
माशाच्या या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे अन्य माशांप्रमाणे हा मासा आपल्या परांचा उपयोग केवळ पाण्यात पोहोण्यासाठीच करीत नाही तर तो या परांचा पायांसारखा उपयोग करत समुद्राच्या तळाशी चक्क चालतो. हा मासा २० वर्षांपूर्वी शेवटा पाहिला गेला होता.
त्यानंतर हा मासा लुप्त झाला होता. तो काही दिवसांपूर्वी टास्मानियाच्या समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला आहे. ‘कॉमनवेल्थ सायंटिफीक अँड इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन’ने (सीएसआयआरओ) हँड फिशचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
मीडिया रिपोर्टस्नुसार हा मासा प्रिमरोज सँडस् टाऊनमधली समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या केरी यारे नावाच्या महिलेच्या सर्वप्रथम दृष्टीस पडला.
केरीला पहिल्यांदा वाटले की तो पफरफिश असावा. मात्र, जवळून पाहिल्यानंतर हा मासा वेगळा असल्याचे तिला जाणवले. तिने त्याचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला. तेव्हा तो २० वर्षांपूर्वी लुप्त झालेला हँड फिश आहे, अशी माहिती पुढे आली.