‘Boat’ चे हे शानदार स्मार्टवॉच शरीराचे तापमान तपासणार

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  बोटचे शानदार स्मार्टवॉच बोट वॉच मर्क्युरी भारतात लॉन्च करण्यात आले आहे. या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे युजर्सला याद्वारे शरीराचे तापमान तपासू शकतात. याशिवाय स्मार्टवॉचमध्ये हृदय गती आणि रक्तातील ऑक्सिजन मॉनिटरिंग उपलब्ध असेल. (boat smartwatch)

ही आहेत काही विशेष वैशिष्ट्ये

बोट वॉच मर्क्युरीमध्ये 1.54 इंच स्क्वेअर डायल आहे.

यामध्ये हृदय गती आणि रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीचा मागोवा घेता येणार आहे

रिअल-टाइम तापमान मॉनिटरिंगची सुविधा देण्यात आली आहे.

याशिवाय, युजर्सला वॉचमध्ये 10 स्पोर्ट्स मोड्स मिळतील.

ज्यामध्ये चालणे, सायकलिंग, धावणे आणि योग यासारख्या ऑप्शनचा समावेश आहे.

युजर्सला त्यांच्या मित्र आणि कुटुंबासह फिटनेस प्रोग्राम ही शेअर करता येणार आहे.

महिलांसाठी मासिक पाळी ट्रॅकर दिला आहे, जो महिलांसाठी खूप उपयुक्त ठरेल.

जाणून घ्या किंमत काय असणार आहे?:-  स्मार्टवॉचची खरी किंमत किंमत 6,990 रुपये आहे. परंतु इंट्रोक्टडरी ऑफर अंतर्गत ते 1,999 रुपयांच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकते. हे स्मार्टवॉच ब्लॅक, ग्रीन, ब्लू आणि क्रीम कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या घड्याळाची विक्री 15 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.