वाघ- सिंह नाही, तर ‘हे’ आहेत जगातले सर्वात खतरनाक 5 सजीव; दरवर्षी लाखो लोकांना जग सोडायला लावतात

Published on -

सध्या भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव आहे. जगातील अनेक देशांमध्येही युद्धाची स्थिती आहे. अशावेळी माणसाचे आयुष्य किती स्वस्त झालेय, याची चर्चा होऊ लागलीय. परंतु तुम्हाला माहित आहे का, की जगात असेही प्राणी आहेत, जे दरवर्षी लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण बनतात. आता तुमच्या डोळ्यासमोर वाघ- सिंह अशा हिंस्त्र प्राण्यांची यादी आली असेल. परंतु नाही… जगात त्यांच्यापेक्षाही खतरनाक जीव आहेत. ते कोणते? तेच आपण पाहू.

डास

जगातील सर्वात खतरनाक सजीव कोणता तर तो म्हणजे डास. एकटा डास जगभरात 7,25,000 लोकांचा जीव घेतो. डासांच्या चावण्याने डेंगू, चिकनगुनिया सारखे गंभीर आजार होतात. याच आजारांत कित्येकांचा मृत्यू होतो. अफ्रीकेसारखे कित्येक देश जगभरात डासांच्या प्रादुर्भावाने त्रस्त आहेत.

साप

सगळ्यात खतरनाक सजीवांत साप हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात 1,38,000 लोकांचा मृत्यू साप चावल्याने होतो. आता ही आकडेवारी जरी अधिकृत असली तरी, यापेक्षा ती किती तरी जास्त आहे. भारताचा विचार केला तर एकट्या भारतात दरवर्षी 60000 लोक साप चावल्याने मरतात. ब्लॅक मांबा या विषारी सापाने मरणाऱ्यांची संख्या जगभरात सर्वात जास्त आहे. भारताचा विचार केला तर भारतात नागाची सर्वात जास्त दहशत आहे.

कुत्रा

खतरनाक जनावरांच्या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे कुत्रा. कुत्रा चावल्याने जगभरात 59,000 लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो. वर्ल्ड हेल्थ आर्गेनाइजेशन (WHO) च्या रिपोर्टनुसार रेबीज होऊन मरणाऱ्यांची टक्केवारी ही 99% आहे, आणि त्याला कुत्रा जबाबदार आहे. कुत्राने चावा घेतल्यावर त्याची लाळ शरीरात जाते आणि त्यानंतर रेबीत होतो, असे वैद्यक सांगतात.

झुरळ

खतरनाक प्राण्यांच्या यादीत झुरळाचा चौथा क्रमांक लागतो. आता हे साधेसुधे झुरळ नाही, तर याचे नाव असेसिन बग (Assassin Bugs) आहे. काळ्या रंगाचा हा झुरळासारखा छोटा किडा दरवर्षी 10,000 लोकांच्या मृत्यूचे कारण ठरतो. या झुरळाने चावा घेतल्यास थेट हृदय व चयापचय क्रियेवर परिणाम होतो. बीबीसी साइंस फोकसच्या अहवालानुसार मध्य आणि दक्षिण अमेरिका किटकाचा सर्वात जास्त प्रकोप आहे.

विंचू

खरतनाक प्राण्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे विंचू. विंचवाच्या चाव्यामुळे दरवर्षी 3,300 लोकांचा मृत्यू होतो. विंचवाच्या जगभरात 2,600 प्रजाती आहेत. त्यातील तब्बल 25 प्रजातींच्या विंचवाचे विष एवढे खतरनाक आहे की, काही तासांत माणसांचा मृत्यू होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe