Mangal Gochar 2024 : यश, शौर्य, भाऊ, जमीन आणि शक्तीचा कारक असलेल्या मंगळ देवाने 8 जुलै रोजी नक्षत्रात प्रवेश केला आहे. मंगळ 26 जुलैपर्यंत कृतिका नक्षत्रात राहील. तर 27 जुलै रोजी रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. मंगळाच्या या नक्षत्र बदलाचा काळ अनेक राशींसाठी अतिशय शुभ राहील. या काळात करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी मिळेल. यश मिळण्याची दाट शक्यता असेल. जीवनात आनंद मिळेल. तसेच अनेक लाभ मिळतील. कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना मंगळाच्या भ्रमणाचा खूप फायदा होणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. करिअर आणि व्यवसायासाठी हा काळ शुभ राहील. पदोन्नतीचे योग येतील. नोकरीचा शोध पूर्ण होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल शत्रूंचा पराभव होईल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांवरही मंगळाच्या विशेष आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. जीवनात सकारात्मक गोष्टी येतील. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. भाग्य तुम्हाला पूर्ण साथ देईल. करिअर आणि बिझनेससाठीही हा काळ चांगला आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांवरही कृतिका नक्षत्रात मंगळ संक्रमणाचा शुभ प्रभाव राहील. करिअर आणि व्यवसायात लाभ होईल. भागीदारीत सुरू केलेल्या व्यवसायात फायदा होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. मित्र आणि नातेवाईकांशी संबंध चांगले राहतील. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा काळ शुभ आहे.
मेष
कृत्तिका नक्षत्रात मंगळाचा प्रवेश मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूही मजबूत असेल.