Underweight Health Risks : वजन कमी असणंही आरोग्यासाठी घातक, वेळेपूर्वीच जाणून घ्या त्याची गंभीर लक्षणे

Ahmednagarlive24 office
Published:
Underweight Health Risks

Underweight Health Risks : अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळं त्यांना शारीरिक तसेच मानसिक आजारांना सामोरे जावे लागते. अनेक उपचार करूनही अनेकांचा आजार लवकर बरा होत नाही. अनेकजण वाढत्या वजनामुळे हैराण असतात.

चुकीचा आहार आणि जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत चालला आहे.  वजन कमी करण्यासाठी ते जिमला जातात, डाएट करतात, परंतु त्यांचे वजन नियंत्रणात येत नाही. तसेच अनेकांचे वजन खूप कमी असते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे वजन कमी असे हे अनेक आजारांना निमंत्रण देतात. वजन कमी असणंही आरोग्यासाठी घातक आहे. वेळेपूर्वीच त्याची गंभीर लक्षणे जाणून घ्या, नाहीतर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

शरीरात चरबी किती गरजेची आहे?

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मतानुसार, निरोगी व्यक्तीचे बीएमआय 18.5 ते 24.9 दरम्यान असणे गरजेचे आहे. जर बीएमआय यापेक्षा कमी असेल तर ते कमी वजनाच्या श्रेणीत येते, त्यामुळे गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते.

करावा लागतो या समस्यांचा सामना

कमकुवत प्रतिकारशक्ती

शरीर पातळ असल्यामुळे त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्याला अनेक प्रकारचे आजार होतात.

कुपोषण

समजा जर कोणी जास्त पातळ असल्यास त्याला पौष्टिकतेच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. तो कुपोषणाला बळी ठरतो.

हाडे कमकुवत होतात

शरीरामध्ये पौष्टिकतेच्या कमतरतेमुळेही ऑस्टियोपोरोसिसची समस्या निर्माण होऊ शकते. या आजारामध्ये हाडांची जाडी कमी होते. त्यामुळे अशा व्यक्तींना दुखापत होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.

वंध्यत्वाची समस्या

समजा एखाद्याचे वजन खूप कमी असेल तर त्याचे हार्मोन्स असंतुलित होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला वंध्यत्वाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

कमी उंची

पोषण पुरेशा प्रमाणात नसल्याने मुलांची वाढ खुंटते. त्यांची उंची कमी प्रमाणात राहते.

यामुळे वजन होते अचानक कमी

  • हायपरथायरॉईडीझम
  • कर्करोग
  • अशक्तपणा
  • एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe