Multibagger Stocks : शेअर आहे की कुबेरचा खजिना! 10 हजारांचे झाले 300 कोटी, जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Multibagger Stocks : शेअर बाजारामध्ये अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते. काही शेअर्समुळे गुंतवणूकदारांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे बाजाराची संपूर्ण माहिती करून त्यात गुंतवणूक करा. तसेच बाजारात काही शेअर्स आहेत ज्यांना मल्टीबॅगर्स शेअर्स असे म्हणतात.

हे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत सर्वात जास्त परतावा देण्यासाठी ओळखले जातात. सध्या असाच एक शेअर आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या गुंतवणूकदारांनी काही वर्षांपूर्वी 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती, आज त्याचे 300 कोटी रुपये झाले आहेत. जर तुमच्याकडे हा शेअर असता तर तुम्ही देखील करोडपती झाला असता. हा कोटक महिंद्रा बँकेचा शेअर आहे. जाणून घेऊयात त्याच्याबद्दल सविस्तर माहिती.

4 वेळा बोनस शेअर्स

दरम्यान, डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट, बोनस आणि राइट्स ऑफर यासारख्या कॉर्पोरेट क्रिया देखील होत आहेत, ज्यांचा परिणाम हा त्या शेअरच्या किमतीवर होत असतो. तसेच ACE इक्विटीनुसार, कोटक बँकेने आपल्या गुंतवणूकदारांना 4 वेळा बोनस शेअर्स दिले आहेत.

10 हजार रुपयांचे झाले 300 कोटी

समजा जर तुम्ही 1985 मध्ये कोटक महिंद्रा बँकेमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज तुम्ही 300 कोटी रुपयांचे मालक झाला असता. दरम्यान, उदय कोटक यांनी काही दिवसांपूर्वी बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. शिवाय कोटकची स्वतःची संपत्ती 14.5 अब्ज डॉलर इतकी आहे. यामधील अनेक भाग त्यांच्या बँकेतील 26 टक्के भागभांडवलामुळे आहे.

थेट 1 लाख नोकऱ्या

कोटक यांनी याबाबत ट्विटरवर असे लिहिले आहे की, ‘आम्ही आता एक आघाडीची बँक आणि वित्तीय संस्था आहोत, जी विश्वास आणि पारदर्शकतेच्या मूलभूत तत्त्वांवर आधारलेली आहे. आम्ही आमच्या भागधारकांसाठी मूल्य निर्माण केले असूनआम्ही एक लाख थेट नोकऱ्या देत आहोत. आमच्या कंपनीत 1985 साली करण्यात आलेली एकूण 10,000 रुपयांची गुंतवणूक आज 300 कोटी रुपये इतकी झाली आहे.