स्वयंपाकात वापरा ‘हे’ तेल ! ‘हे’ तीन आजार तर पळून जातीलच, ढेरी देखील होईल कमी

Ahmednagarlive24 office
Published:
Peanut oil benefits

Peanut oil benefits : आरोग्य धन संपदा असे म्हटले जाते. निरोगी शरीर हे अत्यंत महत्वाचे असते. निरोगी राहण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहार महत्वाचा आहे. यापैकी कोणताही घटक अनियमित असेल तर शरीर रोगांचे घर बनू शकते.

आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी व रोगप्रतीकरण शक्ती वाढवण्यासाठी लोक विविध पदार्थांचे सेवन करतात. परंतु अनेकांना प्रश्न पडतो की, आपण आपल्या आहारात काय समाविष्ट केले पाहिजे. बहुतांश घरांत मोहरी किंवा इतर तेलांचा वापर स्वयंपाकासाठी केला जातो.

पण तुम्हाला माहित आहे का शेंगदाणा तेल हा देखील एक चांगला पर्याय आहे. शेंगदाणा तेलापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने हृदय निरोगी राहते आणि पोटातील चरबी कमी होण्यास मदत होते. चला या ठिकाणी आपण शेंगदाण्याचे तेल कसे फायदेशीर ठरते व कोणत्या आजारांपासून मुक्त होता येते हे जाणून घेऊया.

हृदयाचे आरोग्य

शेंगदाणा तेलात ओमेगा -3 आणि ओमेगा -6 फॅटी ऍसिड असतात. जे निरोगी हृदयासाठी आवश्यक असतात. हे फॅटी ऍसिड रक्तदाब कमी करण्यास, कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.

कोलेस्ट्रॉल

शेंगदाणा तेलात ऑलिक ऍसिड असते. हे एक हेल्दी फॅट आहे जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यास मदत करते.

डायबिटीज कंट्रोल

शेंगदाणा तेल इंसुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करू शकते. यामुळे शरीरातील डायबिटीज कंट्रोल नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.

कर्करोग

शेंगदाणा तेलामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. या अँटीऑक्सिडंट मुळे पेशींना नुकसान होण्यापासून संरक्षण मिळते. काही रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की शेंगदाणा तेलामुळे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe