Vastu Tips For Home : घरामध्ये वावरत असताना दैनंदिन जीवनामध्ये अनेकजण अशा काही चुका करत असतात ज्यामुळे घरात वास्तू दोष निर्माण होत असतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार काही चुकीच्या गोष्टी करणे नेहमी टाळले पाहिजे.
घरामध्ये तुमच्याकडून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून काही चुकीच्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे घरातील सदस्यना आरोग्य समस्या किंवा आर्थिक समस्या निर्माण होत असतात.
घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होण्यासाठी घरातील सदस्य किंवा तुम्ही स्वतः जबाबदार असता. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होऊ नये यासाठी वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगण्यात आले आहेत. त्यानुसार तुम्ही देखील घरात सकारात्मक ऊर्जा तयार करू शकता.
वास्तुशास्त्रात घरामधील काही वस्तू रिकाम्या न ठेवण्यास सांगण्यात आले आहे. जर तुम्ही घरातील काही वस्तू रिकाम्या ठेवल्या तर तुमच्या घरत देखील वास्तुदोष तयार होऊ शकतो. त्यामुळे चुकूनही काही वस्तू रिकाम्या ठेऊ नका.
पाण्याचे भांडे
तुम्हीही तुमच्या घरामध्ये पाण्याचे भांडे ठेवत असाल तर ते कधीही रिकामे ठेऊ नका. बाथरूममध्ये ठेवलेली बादली कधीही रिकामी ठेऊ नका. कारण असे केल्याने तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होत असते. तसेच तुम्हाला आर्थिक समस्या देखील निर्माण होऊ शकतात. कधीही पानाची भांडी पाण्याने भरून ठेवावीत. रात्री झोपताना अशी चूक तुम्ही केल्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
तृणधान्ये
तुमच्या घरामध्ये असलेले धान्याचे भांडे कधीही मोकळे ठेऊ नका. तुमच्या घरामधील धान्य संपले तर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुख्यतः तांदूळ आणि पीठ, ते कधीही संपू देऊ नका.
तिजोरी
तुमच्या घरामध्ये असलेली पैशांची तिजोरी कधीही पूर्णपणे मोकळी होऊ देऊ नका. कधीही तिजोरीमध्ये थोडे का होईना पैसे ठेवा. टिओजोरी रिकामी ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तिजोरी रिकामी ठेवल्याने माता लक्ष्मी नाराज होते.
मंदिरात ठेवलेले भांडे
तुमच्या घरामध्ये देवघरातील पूजेचे भांडे कधीही रिकामे ठेऊ नका. देवघरातील पाण्याचे भांडे नेहमी भरलेले ठेवावे. त्या पाण्याच्या भांड्यामध्ये गंगाजल आणि तुळशीचे पान टाकून भरून ठेवा. असे केल्याने तुमच्या घरत सुख समृद्धी नांदेल.