Vastu tips for money : भारतात असा एकही माणूस नाही जो पैसे कमवण्यासाठी कठोर परिश्रम करत नाही. प्रत्येकाची इच्छा असते आपल्या कडे भरपूर पैसा असावा आणि जीवन आनंदाने जगावे, पण काहीवेळा कठोर परिश्रम करूनही काही लोकांना पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, काहींना कष्ट न करता देखील पैसे मिळतात. पण ज्यांच्याकडे ते नसते त्यांची नेहमीच तक्रार असते की एवढी मेहनत करूनही आपल्याकडे पुरेसे पैसे का नाहीत आणि आपले उत्पन्न का वाढत नाही.
जर तुमचाही असाच विचार असेल तर वास्तुशास्त्राच्या काही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात अशा समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम त्याच्या आर्थिक स्थितीवर होतो. यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होते तर काहींकडे पैसेच राहत नाहीत.
म्हणूनच आज आपण वास्तूचे काही नियम जाणून घेणार आहोत, ज्याचे पालन केल्यास तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि जीवनात तुम्हाला पैशाशी संबंधित कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. चला वास्तूच्या त्या नियमांबद्दल जाणून घेऊया.
वास्तूच्या ‘या’ नियमांचे पालन केल्यास कधीही भासणार नाही पैशांची कमतरता !
-घराची उत्तरेकडील भिंत नेहमी निळ्या रंगाची असावी.
-सजावटीच्या वस्तूंपैकी मत्स्यालय नेहमी तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवावे.
-घरामध्ये तिजोरी नेहमी कुबेराच्या उत्तर दिशेला ठेवावी.
-उत्तर दिशेलाच पाण्याची जागा असावी.
-पाण्याच्या टाकीत शंख, चांदीचे नाणे किंवा चांदीचे कासव नेहमी ठेवावे.
-गणेश आणि लक्ष्मीजींची मूर्ती पूर्व-उत्तर कोपर्यात स्थापित करावी.
-घराच्या पूर्व-उत्तर कोपऱ्यात घाण ठेवू नका.
-निळ्या रंगाचा पिरॅमिड उत्तर दिशेला ठेवल्याने संपत्तीचा लाभ होतो.
-काचेचे मोठे भांडे उत्तर दिशेला ठेवा आणि त्यात चांदीची नाणी ठेवा.
-आवळा किंवा तुळशीचे झाड उत्तर दिशेला लावा.