Vastu Tips : ज्योतिष शास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे जीवनातील अनेक समस्या दूर होण्यासोबतच आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्रात वास्तूला खूप महत्वाचे स्थान आहे.
त्यात असे अनेक सांगितलेले आहेत जे आपल्या आयुष्यातील समस्यांवर सहज मात करू शकतात. परंतु जर एखाद्या व्यक्तीला याबद्दल माहिती नसेल तर तो ज्योतिषाची मदत घेऊ शकतो आणि त्याच्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी उपाय विचारू शकतो.
वास्तूत अगदी सोपे उपाय सांगितले आहेत जे घरी सहज करता येतात. अशातच जर तुम्हीही गरिबीने त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला असेच काही सोपे उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे नशीब रात्रीत बदलू शकता. चला त्या उपायाबद्दल जाणून घेऊया –
गरिबीवर मात करण्यासाठी वास्तू उपाय :-
-एका चपातीवर शुद्ध तूप लावा त्याचे चार तुकडे करा आणि चारही तुकड्यांवर खीर, साखर किंवा गूळ ठेवा. या चपातीचा एक तुकडा गायीला, दुसरा कुत्र्याला, तिसरा कावळ्याला आणि चौथा गरजू व्यक्तीला खाऊ घाला. असे केल्याने तुमच्या आयुष्यातील शत्रू दूर होतील, तसेच जीवनात सुरु असलेल्या आर्थिक समस्या दूर होतील. यासोबतच बिघडलेली कामेही लवकरच मार्गी लागतील. परंतु तुम्हाला हे नियमितपणे करावे लागेल.
-तुमच्या जीवनात शनीची पीडा असो किंवा राहू-केतूचे अडथळे असो, तेही एका तुम्ही अन्न दानाच्या मदतीने दूर करू शकता. काळ्या श्वानाला रोज रात्री चपाती त्यावर मोहरीचे तेल लावून खायला द्यावे. जर काळा श्वान नसेल तर तुम्ही कोणत्याही छोट्या पिल्लाला दूध पाजून हा उपाय करू शकता.
-जर तुमच्या घराच्या दारात गरीब किंवा भिकारी आला तर तुम्ही त्याला शक्य तितके अन्न दान करा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात बदल पाहायला मिळतील तसेच तुमच्या जीवनात प्रगती सुरू होईल. हा उपाय तुमच्या आयुष्यावर रात्रीत परिणाम करेल.