Vastu Tips : फटाफट व्हाल करोडपती! ऑफिस आणि दुकानांमध्ये वास्तुशास्त्रानुसार करा फक्त हे काम…

Ahmednagarlive24 office
Published:
Vastu Tips

Vastu Tips : आजकाल अनेकजण श्रीमंत होण्यासाठी रात्र न दिवस कष्ट करत असतात. पण यामधील काही मोजक्याच लोकांकडे पैसा शिल्लक राहतो तर काही लोकांकडे कितीही कष्ट केले तरी पैसे शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना सतत इतरांकडून पैसे घ्यावे लागतात.

मात्र पैसे टिकवण्यासाठी आणि कमावण्यासाठी वास्तू शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. जर तुम्ही वास्तू शास्त्रात सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन केले तर नक्कीच तुमच्याकडे पैसा टिकेल आणि तुम्ही काळात श्रीमंत व्हाल.

जर तुम्हालाही काही काळात श्रीमंत होईचे असेल तर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये किंवा दुकानात वास्तू शास्त्रानुसार काही काम करावे लागेल. त्यानंतर तुमच्याकडेही पैसा टिकेल आणि तुमची आर्थिक वृद्धी होईल.

या वास्तु उपायांनी दुकानाची तिजोरी नेहमी भरलेली राहील

देवघरापाशी स्वछता ठेवा

तुमच्याकडेही पैसे शिल्लक राहत नसतील तर तुम्हाला काही वास्तू नियम लक्षात घ्यावे लागतील. तुमच्या ऑफिसमधील किंवा दुकानातील देवघराच्या ठिकाणी नेहमी स्वछता ठेवणे गरजेचे आहे.

तसेच अशा ठिकाणी खरकटी भांडी, चहाचे कप किंवा कचरा ठेऊ नका. जर तुम्ही असे केले तर तुमच्यावर माता लक्ष्मी नाराज होईल आणि तुम्हाला आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे या ठिकाणी नेहमी स्वछता ठेवल्याने तुम्हाला कधीही पैशांची कमी भासत नाही.

तिजोरीमध्ये या वस्तू ठेऊ नका

जर तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये तिजोरी असेल तर त्यामध्ये काही वस्तू ठेवणे तुमच्यासाठी आर्थिक नुकसानीचे ठरू शकते. तिजोरीमध्ये कधीही शस्त्रे, चामड्याच्या वस्तू, काळे कापड ठेऊ नका. असे केल्याने तुमच्याकडे पैसा येणार नाही.

तिजोरीच्या आत किंवा बाहेर स्वस्तिक काढा. तसेच त्या काढलेल्या स्वस्तिकमध्ये सुपारी ठेवा. दर बुधवारी गणेश-लक्ष्मीजींची पूजा करा आणि त्यांना अर्पण केलेल्या फुलांची काही पाने तिजोरीत ठेवा.

तिजोरीची योग्य दिशा

तुमच्या घर, ऑफिस किंवा दुकानातील तिजोरी नेहमी योग्य दिशेला असणे आवश्यक आहे. तुमची तिजोरी नेहमी ईशान्य दिशेला ठेवा. तसेच जर तुम्हाला तुमची तिजोरी ईशान्य दिशेला ठेवणे शक्य नसेल तर ती नैऋत्य दिशेला ठेवा. तिजोरी चुकूनही उत्तर आणि पूर्व दिशेला ठेऊ नका. असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्या निर्माण होईल.

तसेच वास्तुशास्त्रात सांगण्यात आल्याप्रमाणे तिजोरीमध्ये कधीही आरसा असू नये. असे करणे तुम्हाला महागात पडू शकते. तुमची आर्थिक वृद्धी होणार नाही. तसेच तुमच्याकडे असणारे पैसे देखील टिकणार नाहीत. त्यामुळे तिजोरीमधील आरसा त्वरित बाहेर काढा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe