Viprit Rajyog 2023 : ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या हालचालींना विशेष महत्व आहे. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळाने आपली राशी बदलतो. या दरम्यान काही विशेष रोजयोग देखील तयार होतात. ज्याचा परिणाम इतर १२ राशींवर दिसून येतो.
दरम्यान, नुकताच ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने धनु राशीत प्रवेश केला आहे, तर 16 डिसेंबर रोजी सूर्याने देखील धनु राशीत प्रवेश केला आहे, अशा स्थितीत बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. दरम्यान, धनु राशीत सूर्याचा प्रवेश झाल्याने विपरित राजयोग देखील तयार झाला आहे. तयार झालेला हा विपरित राजयोग 3 राशींसाठी शुभ मानला जात आहे.
कुंडलीत राजयोग कधी तयार होतो?
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार विपरित राजयोग तयार झाल्यामुळे व्यक्तीला आर्थिक लाभासोबत वाहन आणि संपत्तीचे सुख प्राप्त होते. जन्मकुंडलीच्या सहाव्या, आठव्या, बाराव्या घरातील स्वामींचा संयोग झाला की विपरिता राजयोग तयार होतो. या योगात तिहेरी घरे आणि त्यांचे स्वामी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आदित्य म्हणजे सूर्य. अशा प्रकारे कुंडलीत सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह एकत्र असताना बुधादित्य योग तयार होतो. बुधादित्य योग कुंडलीत ज्या घरामध्ये असतो ते घर मजबूत करतो. कुंडलीत बुध आणि सूर्य एकत्र आल्यास विशेष परिणाम प्राप्त होतात. या राजयोगाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे, चला पाहूया…
कन्या
बुधादित्य राजयोग बुध आणि सूर्याच्या संयोगाने निर्माण झालेला भाग्यवान ठरू शकतो. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. व्यावसायिकांसाठी सुवर्ण काळ आहे, आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. स्थावर मालमत्ता आणि मालमत्तेशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. नोकरदारांना पदोन्नतीचा लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
मेष
विपरित राजयोगामुळे लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच धार्मिक कार्यात रुची वाढेल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची देखील शक्यता आहे. कायदेशीर बाबींमध्येही यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. बुधादित्य राजयोगाने योजना यशस्वी होऊ शकतात. उत्पन्नात मोठी वाढ होईल. भौतिक सुखसोयींसोबत समृद्धी वाढेल. नोकरी-व्यवसायामुळे तुम्ही प्रवासही करू शकता, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
धनु
रवि आणि बुध यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. बुधादित्य राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. व्यक्तिमत्व सुधारेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायासाठी वेळ चांगला राहील, आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. विवाहित लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुंदर होईल. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.
तूळ
या काळात तुमच्यावर सूर्याची कृपा असेल, विपरित राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. तसेच समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरदार लोकांसाठी येणार काळ उत्तम राहील.पदोन्नती आणि पगार वाढण्याची देखील दाट शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला काही प्रकल्प मिळू शकतात. तुमच्या कामात यश मिळू शकते. धार्मिक कार्यात रुची वाढेल. रखडलेल्या कामांनाही गती मिळेल.