अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले आहे. नवीन वर्षात आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी फिरायला जायचे असते. जानेवारीमध्ये अनेक लोकांना बर्फाच्छादित ठिकाणी जाण्याची जास्त ईच्छा असते, कारण इथे फिरण्याची मजा वेगळीच असते.
तुम्हीही भेट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्हाला जानेवारी महिन्यात प्रवास करण्याचा वेगळा अनुभव मिळेल…

१. मनाली (Manali) भारतात अनेक हिल स्टेशन्स आहेत.जी जानेवारी महिन्यात बर्फाच्या चादरीने झाकली जातात. हिमाचल प्रदेशातील ‘मनाली’ या सुंदर हिल स्टेशन्समध्ये समाविष्ट आहे, जे भेट देण्याचे चांगले ठिकाण आहे.
इथे तुम्ही कुटुंब आणि तुमच्या मित्रांसह जाऊ शकता. इथले निसर्गसौंदर्य तुम्हाला बघायला मिळेल. इथे हिडिंबा देवीचे मंदिर आहे, जिथे फिरायला जाता येते. इथल्या गरम पाण्याच्या झऱ्यात आंघोळीचा आनंद लुटता येतो. मनालीमधील बर्फाच्या टेकड्यांमध्ये तुम्ही कॅम्पिंगचा आनंदही घेऊ शकता.
२. दार्जिलिंग (Darjeeling) भारतातील सुंदर ठिकाणांमध्ये समाविष्ट असलेले दार्जिलिंग हे देखील जानेवारीत भेट देण्याचे उत्तम ठिकाण आहे. येथील सुंदर बौद्ध मठ खूप प्रसिद्ध आहेत.
इथली चहाची बाग आणि टॉय ट्रेन खूप प्रसिद्ध आहेत. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी परदेशातून लोक येतात. दार्जिलिंगला गेलात तर टॉय ट्रेनचा आनंद नक्कीच घ्या. येथे भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.
३. गोवा (Goa) गोवा हे देखील भारतातील सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. भटकंतीबद्दल बोललो, तर गोव्याचे नाव येत नाही, असे होऊ शकत नाही. गोवा हे देखील जानेवारी महिन्यात भेट देण्यासाठी योग्य ठिकाण आहे.
इथे शांत समुद्रकिनाऱ्यावर बसण्याचा आनंद वेगळाच असतो. या ठिकाणाचे सौंदर्य केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातूनही अनेकांना आकर्षित करते. लोकांना इथले नाइटलाइफ, पार्ट्या खूप आवडतात.
४. जयपूर (Jaipur) राजस्थानची राजधानी म्हणजे जयपूर लोकांना आपल्या बाजूला आकर्षित करते. पिंक सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरमध्ये पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.
जानेवारी महिन्यात हे शहर अधिकच रंगतदार दिसते. जानेवारी महिन्यात भारतात भेट देण्यासाठी हे आवडते पर्यटन ठिकाण आहे. हवा महल, आमेर किल्ला, जंतर मंतर, चोखी धानी आणि बिर्ला मंदिर अशी अनेक प्रसिद्ध ठिकाणे येथे आहेत.
५. गुलमर्ग (Gulmarg) काश्मीरमधील गुलमर्ग हे जानेवारीत भेट देण्याचे योग्य ठिकाण आहे. स्कीइंग, केबल कार राइड यांसारख्या अनेक रोमांचक गोष्टी येथे करता येतात.
तुम्ही इथे बर्फाचा आनंदही घेऊ शकता. गुलमर्ग हे आशियातील सर्वात उंच आणि सर्वात लांब केबल कारचे ठिकाण आहे. येथील अलपठार तलाव, खिलनमार्ग, महाराणी मंदिर, निंगाळी नाला, सेंट मेरी चर्च ही पर्यटकांसाठी पाहण्यासारखी आहेत.
हि सगळी भारतातील सुंदर ठिकाणांपैकी काही ठिकाणे आहेत, त्यामुळे एकदातरी या ठिकाणी तुम्ही विशेष भेट द्या,आयुष्य सुंदर असल्याचे उत्तर मिळेल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम