Jio आणि Disney+ Hotstar चे विलीनीकरण झाल्यानंतर JioHotstar हे भारतातील OTT सेवा अधिक लोकप्रिय झाली आहे. अनेक वापरकर्त्यांना JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन हव आहे, Airtel ने यासाठी काही जबरदस्त प्रीपेड योजना आणल्या आहेत. या प्लॅन्समध्ये 1 वर्षासाठी Jio Hotstar मोफत मिळण्यासोबत दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि फ्री एसएमएस देखील उपलब्ध आहेत.
Airtel चे Jio Hotstar मोफत मिळणारे टॉप प्रीपेड प्लान्स
₹398 प्लान (28 दिवस वैधता)
या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळेल. जर तुम्ही 5G नेटवर्कमध्ये राहात असाल, तर अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल. याशिवाय, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS यांचा समावेश आहे. या प्लॅनसह तुम्हाला Jio Hotstar वर 28 दिवस मोफत प्रवेश मिळतो.

₹549 प्लान (28 दिवस वैधता)
या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा, अमर्यादित 5G डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 फ्री SMS दिले जातात. याशिवाय, Jio Hotstar साठी 3 महिन्यांचा मोफत प्रवेश मिळतो. हा प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना Airtel Xstream Play Premium चा लाभ मिळतो, ज्याद्वारे तुम्ही 22+ OTT ॲप्स पाहू शकता.
₹1029 प्लान (84 दिवस वैधता)
या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित 5G डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 फ्री SMS मिळतात. यामध्ये तुम्हाला Jio Hotstar साठी 3 महिन्यांचा मोफत प्रवेश मिळतो. ज्यांना लांब वैधतेचा प्लॅन हवा आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
₹3999 प्लान (365 दिवस वैधता) Jio Hotstar मोफत !
हा प्लॅन 1 वर्षाच्या वैधतेसह येतो आणि त्यामध्ये दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित 5G डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS मिळतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 1 वर्षासाठी Jio Hotstar मोफत प्रवेश मिळतो. हा प्लॅन दीर्घकाळासाठी इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
कोणता प्लॅन सर्वात चांगला ?
28 दिवसांसाठी Jio Hotstar हवे असेल तर ₹398 आणि ₹549 प्लान योग्य.
3 महिन्यांसाठी हवे असेल तर ₹1029 प्लान सर्वोत्तम.
1 वर्षासाठी Jio Hotstar हवे असेल आणि जास्त डेटा लागतो असेल तर ₹3999 प्लान बेस्ट पर्याय आहे.