Discount 2023 : सण उत्सवास सुरवात झाली आहे. दिवाळी दसरा हे आगमी सण आता समोर आले आहेत. या सणाला अनेक लोक फ्रिज, वॉशिंग मशीन आदी खरेदी करतात. जर तुम्ही यावेळी फ्रिज किंवा वॉशिंग मशीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ५० टक्के पर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो.
सध्या ऑनलाईन खरेदीचा जमाना आहे. अनेक लोक Amazon किंवा Flipkart सारख्या साईटवरून खरेदी करत असतात. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर अनेक चांगल्या डील्स आहेत. या डील्समध्ये सूट मिळत आहे. तुम्ही फ्रिज किंवा वॉशिंग मशीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी अशाच काही फ्रिज आणि वॉशिंग मशीनची यादी घेऊन आलो आहोत ज्यावर तुम्हाला मोठी सूट मिळत आहे.

Hisense 688 L फ्रिज
या साइड बाय साइड रेफ्रिजरेटरमध्ये डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर देण्यात आला आहे. यात स्पिल प्रूफ अॅडजस्टेबल ग्लास कपाट आहेत. फ्रिजमध्ये वायफाय कंट्रोल आणि डिजिटल लॅम्प सेन्सर आहे. या फेस्टिव्ह सीझनमध्ये तुम्हाला या फ्रिजवर 53% सूट मिळते, त्यानंतर याची किंमत 60,990 रुपयांपर्यंत जाते.
Haier 630L फ्रिज
या फेस्टिव सीजन मध्ये हा फ्रिज तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय ठरू शकतो. त्यात काचेचे कप्पे आहेत. यात अँटी-बॅक्टेरियल गॅस्केटसारखे फीचर्सही आहेत. या रेफ्रिजरेटरवर 41 टक्के सूट मिळत असून, त्यानंतर त्याची किंमत 59,990 रुपये असेल.
LG 655 L फ्रिज
प्रीमियम रेफ्रिजरेटर ऑटो-डिफ्रॉस्ट टेक्निक सह येतो. यात टेम्पर्ड ग्लास शेल्फ आहेत. या फ्रिजची किंमत 42 टक्के सूटसह 69,990 रुपये आहे.
Midea 482 L फ्रिज
या रेफ्रिजरेटरमध्ये चार स्पिल-प्रूफ टफ ग्लास शेल्फ आणि 4 फ्रीजर कंपार्टमेंट आहेत. यात वॉटर डिस्पेंसर आणि अँटी बॅक्टेरियल गॅस्केट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या फ्रिजवर 46 टक्के सूट दिली जात आहे. त्यानंतर याची किंमत 37,990 रुपये होते.
*वोल्टास वॉशिंग मशीन
हे वॉशिंग मशिन वापरायला अतिशय सोपे आहे. हे वॉशिंग मशीन स्टील ड्रमसह येते. या पूर्णपणे स्वयंचलित वॉशिंग मशीनमध्ये 10 वेगवेगळे वॉश प्रोग्राम आहेत. सणासुदीच्या काळात या वॉशिंग मशिनवर 52 टक्के सूट मिळत असून त्यानंतर त्याची किंमत 13,490 रुपयांपर्यंत जाते.
*एसर वॉशिंग मशीन
हे पूर्णपणे ऑटोमैटिक वॉशिंग मशीन आहे. यात उत्कृष्ट फिल्टर देण्यात आला आहे. जे कपड्यांवरील बॅक्टेरिया काढून टाकू शकते. तुम्हाला या वॉशिंग मशीनवर 58 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. त्यानंतर त्याची किंमत 13,490 रुपये असेल.
*हायर वॉशिंग मशीन
हायरचे हे वॉशिंग मशीनही पूर्णपणे स्वयंचलित आहे. याला 5 स्टार रेटिंग आहे. यात 15 वॉश प्रोग्रॅम देण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात या वॉशिंग मशिनवर तुम्हाला 45 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. त्यानंतर त्याची किंमत 12,490 रुपये होते.
*बॉश वॉशिंग मशीन
बॉशचे वॉशिंग मशीन पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. याशिवाय फुल स्टीम सारखे फीचर्सही यात देण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात या वॉशिंग मशिनवर ग्राहकांना 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. त्यानंतर याची किंमत 29,990 रुपये होते.