कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जायचंय? आता ‘या’ दोन शहरांतून सुरु झाली विमानसेवा; वाचा टाईमटेबल

Published on -

कोल्हापूर विमानतळावरून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याचे स्टार एअरवेजकडून नियोजन सुरु आहे. कोल्हापूर ते तिरुपती, अहमदाबाद, मुंबई या शहरांसाठी स्टार एअरवेज विमानसेवा देते. आता त्यांच्याकडून बेंगलोर आणि हैदराबाद या दोन शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. इंडिगो एअरवेजही कोल्हापुरातून या दोन शहरांसाठी विमानसेवा सुरु करणार आहेत.

दोन कंपन्यांचा पुढाकार

कोल्हापूर हे गजबलेले तिर्थक्षेत्र आहे. येथील विमानतळासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नव्या टर्मिनल इमारतीसह कोल्हापूर विमानतळाचा विकास केल्यानंतर आता येथील उड्डाणे वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले जात आहेत. कोल्हापूरच्या कृषी, उद्योग, पर्यटन विकासासाठी त्याचा लाभ होणार आहे.

दोन नवी शहरे जोडणार

सध्या इंडिगो कंपनीमार्फत बेंगलुरु व हैदराबाद या दोन्ही मार्गावर विमान उड्डाण करते. पण प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे स्टार एअरवेजने कोल्हापूर-हैदराबाद -कोल्हापूर ही विमानसेवा दर मंगळवारी आणि बुधवारी सुरू करण्याचे घोषित केले आहे. स्टार एअरवेज आता 15 मे पासून हैदराबाद आणि बेंगलुरु या मार्गावर नव्याने विमानसेवा सुरू करत आहे.

कधी सुटणार विमाने?

स्टार एअरवेजचे विमान हैदराबाद येथून सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी उड्डाण करेल आणि १० वाजून ४० मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचेल. त्यानंतर दुपारी तीन वाजता कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण केलेले विमान ४ वाजून ५ मिनिटांनी हैदराबादमध्ये पोहोचेल. प्रत्येक मंगळवार, बुधवार आणि रविवार या दिवशी कोल्हापूर-बंगळुरू-कोल्हापूर या मार्गावर स्टार एअरवेजचे विमान प्रवाशांना सेवा देईल. याशिवाय बंगळुरसाठी कोल्हापुरातून सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी विमान उड्डाण घेईल ते १२ वाजून ३५ मिनिटांनी बंगळुरूमध्ये उतरेल. बंगळुरूमधून दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी विमान कोल्हापूरच्या दिशेने उड्डाण करेल आणि २ वाजून ३५ मिनिटांनी कोल्हापुरात येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe